spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा

– संविधान उद्देशिकेचे वाचन

यवतमाळ :- जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधान उद्दिशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी उद्देशिकेचे वाचन केले. ‘आम्ही भारताचे लोक या शब्दांनी सुरू झालेली ही राज्यघटना भारतीयांनीच निर्माण करून ती स्वत:लाच अर्पण केली आहे. विचारांचे स्वातंत्र्य, संधीची समानता, न्याय, बंधुता यांच्यासह आपल्या राज्यघटनेत नागरिकांचे मुलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे आदींचा उल्लेख आहे. राज्यघटनेचा अभ्यास प्रत्येक नागरिकाने करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles