नागपूर :- पोहरा नदीत सिवरेज पाईप लाईन सोडल्या प्र. 34 पिपळा रोड पुलाजवळ सीवरेज लाईनचे पाईप पोहरा नदीत डायरेक्ट सोडले असून प्रभाग 29 मधून याचा प्रवाह जात असताना नरसाळा भागात stp प्लांट जवळ याचा प्रवाह थांबवल्या जात असल्याने पिपळा रोड हुडकेश्वर रोड व नरसाळा भागात दुर्गंधी पसरली असून पोहरा नदीच्या पुलावरून आवागमन करणाऱ्या तसेच नदीच्या आजूबाजूला असणाऱ्या साईनगर ,गणेश धाम, श्याम नगर पवन नगर, सेंट पॉल शाळा आदर्श शाळा, एस ओ एस स्कूल भाग असलेल्या लोकवस्तीतील जनता दुर्गंधी ने त्रस्त झाली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
पोहरा नदीच्या आजूबाजूला अनेक शाळा व दाट लोकवस्ती असून अनेक नागरिक पायदळ व वाहनांनी स्कूल बसेस अनेक नागरिक रोज हुडकेश्वर पुलावरून तथा पिपळा पुलावरून शाळा कॉलेज मध्ये जाण्यासाठी आबा आवा गमन करत असतात प्रशासनाने तात्काळ संबंधित विषयाची दखल घेऊन त्वरित उपाययोजना करून पोहरा नदीचे दूषिति करण थांबवणे व जनतेच्या सुरक्षित आरोग्याला प्राथमिकता देण्याचे कार्य करावे. अशी मागणी शिवसेना विधानसभा संघटक विशाल कोरके यांच्या तर्फे करण्यात आली. या निवेदनाला प्रामुख्याने शहर संघटिका निलीमा शास्त्री, किरण शेळके, उज्वला उंमरे नलिनी सदावरती, रूपाली लाखे, अनिता डोमळे, उज्वला शंभरकर, सोनाली उमरे, आरती शर्मा इत्यादी उपस्थित होते.




