spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

6 डिसेंबरला संविधान वाचनाचा समारोप

नागपूर :- भारतीय संविधानाच्या अमृत मोहत्सवी वर्षा निमित्ताने भारतीय संविधानाच्या 395 अनुच्छेदांचे वाचनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून तब्बल 11 दिवस संविधानातील 395 कलमांचे अनुच्छेंदांचे वाचन वैशाली नगरातील वैशाली चौकात पार पडले.

जेष्ठ पत्रकार आणि लेखक भागवत लांडगे यांनी सतत 11 दिवस संविधानाचे वाचन केले. या वाचन कार्यक्रमाला मीडियासह समता सैनिक दलाचे सैनिक आणि सुज्ञ नागरिकांचा सहभाग लाभला. शेषराव गणवीर, कमांडर विश्वास पाटील, मैत्रय डेव्हलपरचे अजय पाटील, मधुकर ठवरे, गजानन मडके, बाळू वाघमारे यांच्यासह बबन जांभुळकर आवाज विदर्भ नागपूरचे संपादक सुजाता मसराम, लोक जागृती न्यूज २४ चे संपादक महेश उईके इत्यादींचे सहकार्य यावेळी लाभले. संविधान चौकातील संविधानदिनी वाचनाला सुरुवात झाली. उद्घाटन प्रसंगी ॲड. महेंद्र बनसोड यांच्या अध्यक्षतेत राजश्री इंगळे एड. स्मिता कांबळे, डॉ. नरेंद्र कोडवते, भैय्याजी खैरकर, प्रा. प्रदीप बोरकर डॉ. भीमराव मस्के प्रा.रमेश पिसे यांनी संविधानावर मार्गदर्शन केले. शनिवारी ६ डिसेंबर 2025 रोजी संविधान वाचनाचा समारोपीय कार्यक्रमाला एड.महेंद्र बनसोड एड.समीक्षा गणेशे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत हे मार्गदर्शन करतील. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे ज्येष्ठ पत्रकार भागवत लांडगे यांनी कळविले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.