spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पोलीस बॉईज असोसिएशन नागपूर जिल्हाध्यक्षपदी राजेश हरडे यांची नियुक्ती

नागपूर :- पोलिस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांनी नोव्हेंबर 28 रोजी झालेल्या बैठकीत नागपूर जिल्हा अध्यक्षपदावर राजेश रमेश हरडे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रमोद वाघमारे यांनी सांगीतले की कित्येक वर्षापासून पोलीस खात्याच्या हितासाठी कार्य करणारे राजेश हरडे यांनी कोरोना महामारीच्या वेळेस परिसरातील विभिन्न सामाजिक कार्यात सहभागी होवुन गोरगरीब होतकरू व बेघर असलेल्या लोकांना निस्वार्थ भावनेने मदत केली. जनतेची सेवाभाव च्या उद्देशाने मदत करणे हे त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या या विशेष व या प्रकारचे उत्कष्ट कार्याला बघुन वाघमारे यांनी त्यांची नियुक्ती पोलीस बॉईज असोसिएशन च्या नागपूर जिल्हा अध्यक्षपदावर नियुक्ती केली. याप्रसंगी नागपूर शहर नागपूर ग्रामीण यांनी सांगीतले की ते शहर व ग्रामीण येथे दौरा करुन संघटनेला वाढविणे व मजबुत करण्याचे कार्य आपल्या टीम सोबत पोलीस बॉईज असोसिएशन संस्थापक अध्यक्षांच्या मार्गदर्शनाने पोलीसांशी संबंधीत समस्यांच्या निवारणाकरीता सदैव कार्य करीत राहु. राजेश हरडे यांनी नियुक्तीच्या दरम्यान संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे, पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र सचिव भुपेन्द्र निमगडे, डॉ.भूषण सोळंकी, अड.अंकुश पानतावणे आणि बबन सोमकुंवर या सर्वांचे आभार मानले व उच्च स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Popular Articles