Related Posts

सर्वार्थ समाधानी

<p><strong>…शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असे मार्गदर्शक तत्त्व एकेकाळी विशेषत&colon; परराष्ट्र संबंधांबाबत सांगितले जात असे&period; सद्या&colon;स्थितीत सर्व संबंध हेच मुळात फक्त व्यावहारिक झालेले असताना मित्र-शत्रू वगैरे चर्चा व्यर्थ…<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>भारत दौऱ्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या कोडकौतुकात आपण कोणतीही कसूर ठेवली नाही&comma; हे उत्तम झाले&period; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे माथेफिरू प्रेमवीराप्रमाणे वागत असताना त्यांना आपल्याकडून &OpenCurlyQuote;तू नही और सही’ असा संदेश दिला जाणे गरजेचे होते&period; तो पुतिन यांच्या भारत दौऱ्यात भरभरून देता आला&period; त्याची गरज ट्रम्प यांनीच निर्माण केली&period; ट्रम्प यांच्या हास्यास्पद धोरण- असातत्याने अमेरिका महान होईल&comma; न होईल&period; पण त्यांच्या अशा वागण्याने अमेरिकेविरोधातील देशांचे संबंध अधिक दृढ होऊ लागतील&semi; हे निश्चित&period; पुतिन यांच्या या दौऱ्यात त्याची प्रचीती आली&period; वास्तविक ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षपदाच्या काळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध गोड मधुचंद्री होते&period; तेव्हा त्यामुळे पहिल्यांदाच आपण रशियापासून दूर जात असल्याचे चित्र निर्माण झाले&period; ते काही प्रमाणात योग्यही होते&period; कारण पुतिन यांचा रशिया हा सोविएत रशिया नाही&period; लष्करी उत्पादनांचा दर्जा खालावता आहे आणि काही वेगळी औद्याोगिक प्रगती या रशियास करता आलेली नाही&period; त्यात तसेही जग एककेंद्री होत होते&period; हे एकमेव केंद्र म्हणजे अमेरिका&period; पण स्वत&colon;च्या देशाचे मोठेपण ट्रम्प यांच्यासारख्या खुजा व्यक्तीस खुपू लागले आणि त्यांनी जगातील अनेकांस अमेरिकेविरोधात उभे राहण्याची संधी दिली&period; ती आपण साधली&period; कारण आपणासाठीही पर्याय नव्हता&period; चीनने टोकले&comma; अमेरिकेने टाकले अशा वेळी रशियास टिकवणे शहाणपणाचे होते&period; तो शहाणपणा आपण दाखवला&period; म्हणून या भेटीचे स्वागत&period;<&sol;p>&NewLine;<p>युक्रेनवर युद्ध लादल्यानंतर पुतिन यांचा हा पहिला भारत दौरा&period; या युद्धास काही महिन्यांत चार वर्षे होतील&period; ते युद्ध थांबावे म्हणून अमेरिकेसह सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत&period; पण पुतिन काही त्यांच्या हाती लागू देत नाहीत&period; त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक निर्बंध लादले गेले&period; त्याचा फायदा आपल्याला स्वस्त तेलाच्या रूपाने झाला&period; पण अमेरिकेने आपल्यावर ५० टक्के निर्बंधांची गदा चालवल्यानंतर त्यावर आपणास पाणी सोडावे लागेल&comma; हे स्पष्ट झाले&period; त्यामुळे आपल्या कंपन्यांस रशियन तेल खरेदीचे प्रमाण कमी करत आणावे लागले&period; यातून एक तिढा निर्माण झाला&period; अमेरिका ही या तिढ्यातील समान बाजू&period; एका बाजूने आपले अमेरिकेशी करार कुंथणे सुरू असताना रशियाचीही अडचण वाढत गेली&period; या तिढ्यास एक चौथा&semi; पण अदृश्य कोन आहे&period; तो आहे चीन&period; अमेरिकेने डोळे वटारल्यामुळे आणि युरोप हा युक्रेनच्या मागे उभा राहिल्यामुळे पुतिन यांनी वेगळे संधान बांधले&period; ते म्हणजे चीन&period; त्या देशाचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि पुतिन यांच्यात गेल्या काही महिन्यातील सौहार्दाचे संबंध दिसतात ते यामुळे&period; म्हणजे एकाच वेळी भारत&comma; रशिया आणि चीन या तीनही देशांचा एकच समान दु&colon;खबिंदू तयार झाला&period; अमेरिका&period; अशा वेळी हे अमेरिकादु&colon;ख कमी करण्यासाठी पुतिन हे चीन आणि क्षी जिनपिंग यांच्या अधिक जवळ जात राहिले तर आपल्यासाठी ती दुहेरी डोकेदुखी ठरली असती&period; म्हणजे आपण इतके काही करूनही ट्रम्प आपणास भीक घालण्यास तयार नाहीत&comma; क्षी जिनपिंग आणि चीन यांच्यावर विश्वास टाकण्यात अर्थ नाही आणि असे असताना पुतिनही आपल्यापासून दूर गेले तर सगळेच आंतरराष्ट्रीय मुसळ केरात म्हणायचे&period; ते टाळणे आणि रशिया-चीन संबंध अधिक सुमधुर होण्यापासून थांबवणे ही आपली गरज होती&period; पुतिन यांच्या भारत दौऱ्यासही पार्श्वभूमी आहे&period; ती लक्षात घेतल्याखेरीज पुतिन यांचे आपण इतके कोडकौतुक का केले&comma; हे समजून घेता येणार नाही&period; तेव्हा आपण पुन्हा एकदा पं&period; नेहरू यांनी घालून दिलेल्या &OpenCurlyQuote;गड्या आपला रशिया बरा…’ या मार्गावर आलो&period;<&sol;p>&NewLine;<p>पं&period; नेहरूंनी घालून दिलेला तो मार्ग अधिक प्रशस्त करण्याच्या आणाभाका पुतिन यांच्या दौऱ्यात घेतल्या गेल्या&period; त्याचाच एक भाग म्हणून २०३० पर्यंत उभय देशांतील व्यापार कित्येक पट वाढवण्याचा निर्धार उभयतांनी केला&period; देश कोणताही असो&period; व्यापारवृद्धी नेहमीच स्वागतार्ह&period; कारण अर्थव्यवस्थेच्या गतीसारखी उत्तम दुसरी कोणती गती नाही&period; त्यामुळे ती वाढत असेल तर उत्तम&period; तथापि यातील तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही&period; विशेषत&colon; आपणास हव्या असलेल्या &OpenCurlyQuote;एस-४००’ या विशेष हवाई सुरक्षा यंत्रणेबाबत काय निर्णय झाला हे समजणे आवश्यक&period; कुख्यात पहेलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान चकमकीत निर्णायक भूमिका या &OpenCurlyQuote;एस-४००’ यंत्रणेने बजावलेली होती&period; त्यामुळे आपणास ही यंत्रणा अधिक मोठ्या प्रमाणावर हवी आहे&period; तसेच &OpenCurlyQuote;राफेल’च्या जोडीला आपण रशियाची &OpenCurlyQuote;एसयू-५७’ ही लढाऊ विमानेही खरेदी करू इच्छितो&period; पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कॉव्ह यांनी भारताच्या या खरेदी प्रयत्नांसंदर्भात दौऱ्यापूर्वी भाष्य केले होते&period; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्या चर्चेत हे विषय नक्की येतील असे त्यांचे म्हणणे&period; त्याचे पुढे काय झाले&comma; याचा तपशील तूर्त उपलब्ध नाही&period; लष्करी साहित्य उत्पादनामध्ये &OpenCurlyQuote;आत्मनिर्भर’ होण्याचा आपला स्तुत्य प्रयत्न असला तरी सध्या तरी आपणास अन्य अनेकांवर अवलंबून राहावे लागणार हे वास्तव&period; ते सर्व जाणतात&period; त्याचमुळे अमेरिका आपल्या गळ्यात &OpenCurlyQuote;एफ-३५’ विमाने मारते&comma; रशियाची &OpenCurlyQuote;एस-४००’ यंत्रणा आपल्यासाठी निर्णायक ठरते आणि पाकिस्तानबरोबरील युद्धात फ्रान्सच्या &OpenCurlyQuote;राफेल’चे काय झाले याचीच बातमी होते&period; या वास्तवामुळे दर्जा दुय्यम असला तरी आपणास रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करावी लागणार&period; एकेकाळी आपली लष्करी उत्पादनांची जवळपास तीन-चतुर्थांश गरज रशियन उत्पादने भागवत असत&period; मध्यंतरी हे प्रमाण एकतृतीयांशावर आले&period; कारण फ्रान्स&comma; अमेरिका आणि इस्रायल यांच्याकडून आपण मोठ्या प्रमाणावर खरेदी केली&period; तथापि बदलत्या जागतिक परिस्थितीत आपणास पुन्हा एकदा रशियाकडे जावे लागेल&comma; असे दिसते&period; ती आपली गरज आहेच&comma; पण रशियाची गरज भागवत राहणे ही आपली अधिक मोठी गरज बनलेली आहे&period; याचे श्रेय अर्थातच ट्रम्प यांचे&period; आणि दुसरे असे की खुद्द अमेरिकाच जर पुतिन यांच्याशी व्यापार चर्चा करत असेल तर अमेरिकेच्या भीतीपोटी आपण आपल्या व्यापारी हितसंबंधांस मुरड घालण्याची काहीच गरज नव्हती&period; आज ना उद्या आपणास अमेरिकेशी व्यापार कराराच्या मुद्द्यावर भिडायचे आहेच&period; तसेच युक्रेनशी युद्धबंदी करण्याच्या मुद्द्यावर रशियासही अमेरिका आणि युरोप यांच्याशी दोन हात करायचे आहेत&period; तेव्हा ते होईपर्यंत अन्य देश आणि देशसमूह आपापले व्यापार संबंध सांभाळत असताना आपण त्याकडे दुर्लक्ष करणे अगदीच अयोग्य&period; ते आपण केले नाही&period;<&sol;p>&NewLine;<p>शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असे मार्गदर्शक तत्त्व एकेकाळी विशेषत&colon; परराष्ट्र संबंधांबाबत सांगितले जात असे&period; सद्या&colon;स्थितीत सर्व संबंध हेच मुळात फक्त व्यावहारिक &lpar;ट्रान्झॅक्शनल&rpar; झालेले असताना मित्र-शत्रू वगैरे चर्चा व्यर्थ&period; त्याच व्यावहारिक दृष्टिकोनातून पुतिन यांची भारतभेट महत्त्वाची होती&period; आणि आवश्यकही&period; या सर्व गरजा या दौऱ्यात पूर्ण झाल्या&period; बाकी त्यांच्या दौऱ्याचा मुहूर्त साधून रशियाच्या &OpenCurlyQuote;आरटी’ वृत्तवाहिनीची सेवा पुन्हा आपल्याकडे सुरू झाली&period; त्यामुळे आपल्याकडील &OpenCurlyQuote;प्रोपगंडा’ वाहिन्यांत आणि प्रोपगंडोत्सुक पत्रकारांच्या व्यवसायसंधीत आणखी एकीची भर&period; पुतिन यांच्या त्या गरजेची पूर्तताही हा दौरा करतो&period; सर्वांच्याच गरजा यात पूर्ण होत असल्यामुळे या दौऱ्याचे फलित सर्वार्थाने समाधानकारक म्हणावे लागेल&period;<&sol;p>&NewLine;