spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

घरफोडीचे २ उघड, आरोपीस अटक

मौदा :- फिर्यादी नामे शिवम प्रभुजी गिरडकर, रा. तारसा यांनी पोलीस स्टेशन मौदा येथे दिनांक २२/१०/२०२५ चे रात्री ०८/०० वा. ते २३/१०/२०२५ चे सकाळी ०६/०० वा. दरम्यान अज्ञात चोरटयानी त्याचे तारसा येथील दुकानाचे शटरचे कुलूप तोडुन दुकानातुन नगदी १५,०००/- रूपये चोरी केल्याचे फिर्यादीचे तोडी रिपोर्ट वरून पोलीस ठाणे मौदा येथे अप कं ८१५/२०२५ कलम ३३१ (४),३०५(अ) भा.न्या.स. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरीष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात मौदा पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाने गुप्तबातमीदार आणि तांत्रिक पुराव्याच्या अधारे तसेच गुन्हा करण्याची पध्दत या माहीतीच्या आधारे दिनांक ०५/१२/२०२५ रोजी तारसा येथे राहणारा आरोपी नामे अर्जुन ज्ञानेश्वर हटवार, वय. ३६ वर्ष, रा. तारसा यास ताब्यात घेतले. नमुद आरोपीकडे पोलीसांनी सखोल आणि कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता त्याने सदर घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच या व्यतिरिक्त पोलीस स्टेशन मौदा अप कं ५८७/२०२५ मधील फिर्यादीच्या घरातुन सुध्दा नमुद आरोपी ने १५,०००/- चोरी केल्याची माहीती पोलीसांना प्राप्त झाली. नमुद आरोपीने अशा दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली. मौदा पोलीसांनी नमुद आरोपीला अटक करून त्यांचे कडुन गुन्हयातील चोरीस गेलेली रोख रक्कम हस्तगत करण्यात केली आहे.

उघडकीस आलेले गुन्हे

१. पोलीस स्टेशन मौदा अप क ५८७/२०२५ कलम ३३१ (४), ३०५ (अ) भा.न्या.स.

२. पोलीस स्टेशन मौदा अप कं ८१५/२०२५ कलम ३३१ (४), ३०५ (अ) भा.न्या.सं


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.