Related Posts

जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी

<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिनांक ०७&period;१२&period;२०२५ च्या मध्यरात्री पासून ते दिनांक २१&period;१२&period;२०२५ च्या मध्यरात्रीपर्यंत &lpar;१५ दिवस&rpar; जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत&period; माओवाद्यांकडून &&num;8216&semi;पीएलजीए सप्ताहा&&num;8217&semi;दरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसक व गंभीर घटना घडवण्याची शक्यता तसेच विविध राजकीय पक्ष&comma; संघटनांकडून मोर्चे&comma; आंदोलने होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम&comma; १९५१ चे कलम ३७ &lpar;१&rpar; आणि &lpar;३&rpar; अन्वये हा निर्णय घेण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या काळात शस्त्रे&comma; स्फोटक पदार्थ किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बरोबर नेण्यास सक्त मनाई आहे&period; याव्यतिरिक्त&comma; कोणतेही दाहक किंवा उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दर्शवणारे आवेशपूर्ण भाषण&comma; घोषणा&comma; चित्रे किंवा चिन्हे यांचे प्रदर्शन करण्यास बंदी आहे&period; विशेषतः&comma; उपविभागीय दंडाधिकारी किंवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मिरवणूक काढण्यास मनाई असून&comma; सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे&period; हे सर्व प्रतिबंध संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी लागू राहतील&comma; असे आदेशात नमूद केले आहे&period;<&sol;p>&NewLine;