Related Posts

‘सीडीपीओं’चा हलगर्जीपणा; अंगणवाड्यांचा निधी गेला परत !

<p><strong>&&num;8211&semi; वर्धा आणि आर्वी प्रकल्पातील प्रकार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>वर्धा &colon;-<&sol;strong> शासनाकडून अंगणवाड्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी प्रति अंगणवाडी २ हजार रुपये प्रशासकीय खर्च आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या गणवेशासाठी प्रत्येकी १ हजार रुपयांचा निधी दिला जातो&period; वर्धा जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांसाठी हा निधी जून महिन्यात प्राप्त झाला होता&period; मात्र&comma; आर्वी आणि वर्धा बालविकास प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार आणि हलगर्जी कारभारामुळे हा निधी विहित मुदतीत वितरित न झाल्याने अखेर शासनाकडे परत गेल्याची माहिती समोर आली आहे&period; परिणामी&comma; दोन्ही प्रकल्पातील शेकडो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हक्काच्या निधीपासून वंचित राहिल्या असून त्या अद्यापही या निधीच्या प्रतीक्षेत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>महिला व बालविकास विभागांतर्गत येणाऱ्या वर्धा आणि आर्वीच्या बालविकास प्रकल्पामध्ये गेल्या काही दिवसांपासून मनमर्जी कारभार सुरु आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नुकताच काही दिवसांपूर्वी आर्वीच्या प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांच्या यादी पदभरतीची गुणवत्ता तपासण्याकरिता वर्ध्याच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी विनापरवानगीने दुसऱ्या प्रकल्पातील विस्तार अधिकाऱ्यांना सोबत नेल्याचे प्रकरण समोर आले होते&period; यासंदर्भात आधीच वर्ध्याच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली होती&period; आता निधी परत गेल्याचेही प्रकरण समोर आल्याने कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण याले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>१८ लाख ३६ हजाराचा निधी झाला होता प्राप्त<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>जिल्ह्यात एकूण १४२२ अंगणवाड्या आहेत&period; जून महिन्यात जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांना प्रशासकीय आणि साडी खरेदीचा एकूण १८ लाख ३६ हजार रुपयांचा निधी एकाच वेळी प्राप्त झाब होता&period; निधी मिळताच जिल्ह्यातील इत सर्व प्रकल्पांनी तत्परता दाखवून तो अंगणवाड्यांसह सेविका आणि मदतनीस यांच्या खात्यात वळता केला&period; परंतु&comma; आर्वी प्रकल्प&comma; वर्धा प्रकल्प-१ आणि प्रकल्प-२ च्या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे या भागातील निधी वेळेत वितरित होऊ शकला नाही&period; शासकीय नियमांनुसार मुदतीत खर्च न झाल्याने हा हक्काचा निधी शासनाकडे परत गेला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>प्रकल्प अधिकारी विसरले&comma; १८ लाख ३६ हजारांचा हिशेब चुकला&excl;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>आर्वी आणि वर्धा प्रकल्पांतर्गत एकूण ४५९ अंगणवाड्या येतात&period; प्रत्येक अंगणवाडीमध्ये एक अंगणवाडी सेविका आणि एक मदतनीस कार्यरत असतात&period; या सर्व अंगणवाड्यांचा विचार केल्यास प्रशासकीय खर्च ९ लाख १८ हजार तसेच सेविका आणि मदतनीसांच्या गणवेशाचे प्रत्येकी १ हजार रुपयांप्रमाणे ९ लाख १८ हजार असे एकूण १९ लाख ३६ हजारांचा निधी शासनाकडे परत गेल्याने दोन्ही प्रकल्प अधिकाऱ्यांचा हिशेब चुकल्याने अंगणवाड्यांच्या अडचणीत भर पडली आहे&period;<&sol;p>&NewLine;