Related Posts

ST बस NCMC कार्ड सक्तीबाबत मोठा निर्णय

<p><strong>&&num;8211&semi; नियम शिथिल&semi; प्रवाशांना दिलासा&comma; १&period;१० कोटी नोंदणी&excl;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे&period; एसटी महामंडळाच्या बसमधून शासनाच्या सवलतीत प्रवास करणाऱ्या महिला आणि ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीचे तिकीट आता NCMC कार्डद्वारे दिले जात आहे&period; या योजनेच्या अंमलबजावणीबाबत अनेक अडचणी येत असल्यामुळे NCMC कार्ड सक्तीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रवासासाठी महिलांना बंधनकारक करण्यात आलेल्या &&num;8216&semi;नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड&&num;8217&semi;ची &lpar;NCMC&rpar; सक्ती एसटी महामंडळाने शिथिल केली आहे&period; ७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत एनसीएमसी कार्ड नसले तरी एसटीच्या सवलतीच्या महिलांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे&period; तांत्रिक अडचणी आणि ग्रामीण भागात महिलांपर्यंत पुरेशी माहिती न पोहोचल्याने महामंडळाने हा दिलासादायक निर्णय घेतला&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>१ जानेवारी २०२७ पासून NCMC कार्डची अट पुन्हा लागू<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>दिवाळीनिमित्त गावी किंवा देवदर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या सवलतीचा लाभ आता NCMC कार्डशिवाय घेता येणार आहे&period; एसटी महामंडळाने एनसीएमसी कार्डची सक्ती ३१ डिसेंबरपर्यंत शिथिल केल्यामुळे आता NCMC कार्ड नोंदणी न झालेल्या पात्र प्रवाशांनाही सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे&period; १ जानेवारी २०२७ पासून एसटी प्रवास सवलतीसाठी &OpenCurlyQuote;एनसीएमसी’ कार्डची अट पुन्हा लागू राहणार आहे&period; केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रवास सवलतीची नोंद ठेवण्यासाठी ही योजना राबवली जात असल्याचे म्हटले जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>NCMC कार्ड सक्तीमुळे ST बसचे उत्पन्न घटले<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>१ ऑक्टोबरपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड एसटी महामंडळाने अनिवार्य केले होते&period; कार्ड नोंदणी&comma; सक्रिय करणे आणि वापरातील अडचणींमुळे महिला प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी होत्या&period; सप्टेंबरमध्ये एसटीला दररोज सरासरी ३३ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते&period; ऑक्टोबरमध्ये हे उत्पन्न २८ कोटी रुपयांपर्यंत घसरले&period; दैनंदिन उत्पन्नात पाच कोटी रुपयांची घट झाली&period; सप्टेंबर २०२४ मध्ये महामंडळाचा तोटा मागील वर्षाच्या तुलनेत ३६ कोटी ३३ लाख रुपयांनी वाढला&period; या घसरणीमागे एनसीएमसी कार्डची सक्ती हेच कारण असल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नसले&comma; तरी कार्डच्या अंमलबजावणीतील अडचणींचा मुद्दा चर्चेत आला होता&period;<&sol;p>&NewLine;