बुट्टीबोरी :- एमआयडीसी बुट्टीबोरी पोलीसांना गोपनिय माहीती प्राप्त झाली की, हद्दपार इसम नामे शकील उर्फ सागिर साहाब खान, वय ४३ वर्षे, रा. बिडगणेशपुर, ता. हिंगणा, जि. नागपुर हा त्याचे मुळगावी बिडगणेशपुर येथील घरी वास्तव्य करीत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी मौजा बिडगणेशपुर येथे जावुन शाहनिशा केली असता हद्दपार आरोपी शकील उर्फ सागिर साहाव खान त्याचे राहते घरी मिळुन आला. नमुद आरोपीला उपविभागिय दंडाधिकारी, नागपूर यांनी नागपुर जिल्हयातुन हद्दपार केले असुन नमुद आरोपीने कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता हदद्वार आदेशाचे उल्लंघन करून नागपुर जिल्हयात प्रवेश केला असल्याने नमुद आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन एमआयडीसी बुट्टीबोरी येथे कलम १४२ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हे नोंद केला आहे.








