spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गुन्हे तपासासाठी विकसित करण्यात आलेले MahaCrimeOS Al Copilot चे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ यांनी लोकार्पण केले

नागपूर :-  गुन्हे तपासासाठी विकसित करण्यात आलेले कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञान Maha CrimeOS Al Copilot याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे औपचारिक लोकार्पण केले.

MARVEL -Maharashtra Advanced Research and Vigilance for Enhanced Law Enforcement आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या संयुक्त विद्यमाने MahaCrimeOS Al Copilot हे गुन्हे तपासासाठी विकसित करण्यात आले असून मार्च २०२५ पासुन नागपूर ग्रामीण पोलीस दलात गुन्हे तपासांसाठी प्रथमच याचा वापर सुरू करण्यात आला सदर लोकार्पण सोहळयात हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि सत्या नडेला यांना MahaCrimeOS बाबत सविस्तर माहीती दिली. तसेच MahaCrimeOS हे अत्याधुनिक Al Copilot असुन ते सायबर अर्थिक फसवणुक डिजीटल फसवणुक, डिजीटल अटक, इन्व्हेस्टमेंट फसवणुक तसेच इतर गुन्हे तपासात तात्काळ मदत करते त्यामुळे अर्थिक फसवणुकीमधील रक्कम परत मिळविण्यास तसेच आरोपी अटक करण्यास मदत होते. MahaCrimeOS मध्ये प्रत्यक्ष तपास करणारे सहा. पोलीस निरीक्षक आशिषसिंह ठाकुर आणि पोलीस नाईक व.नं. १६३६ संगिता गांवडे यांनी MahaCrimeOS Al Copilot चा गुन्हे तपासात वापर याबाबत सविस्तर माहीती दिली आणि त्याबाबत प्रात्यक्षित सुध्दा करून दाखविले. सदर Al Copilot चा तपासात वापर केल्याने तपासाची गती आणि दर्जा कशा प्रकारे वाढला याबाबत सुध्दा सविस्तर माहीती देण्यात आली.

हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आणि देखरेखीखाली आतापर्यंत नागपूर ग्रामीण पोलीस दलात MahaCrimeOS बाबत १२७अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांनी २६० हून अधिक प्रकरणांच्या तपासात याचा यशस्वी वापर केला आहे.अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या सह इतर तपास अधिकारी है याचा प्रभावीपणे वापर करीत असुन या Al तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगामुळे नागपूर ग्रामीण पोलीस दल राज्यातील एकमेव घटक ठरले ज्याने माननीय मुख्यमंत्रीच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमातील पोलीस गटातील सर्व तीन श्रेणींमध्ये पुरस्कार मिळवले, यात जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, सावनेर आणि उमरेड पोलिस स्टेशन यांचा समावेश आहे. MahaCrimeOS AI Copilot हे गुन्हे तपास प्रक्रियेला वेगवान, अचूक आणि डेटा-आधारित बनवते, ज्यामुळे पोलीस अधिकारऱ्यांना जटिल प्रकरणे सोडवण्यात मदत होते. सदर लोकार्पण सोहळयात मा. मुख्यमंत्री यांनी हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण आणि नागपुर ग्रामीण पोलीसांचे अभिनंदन तसेच कौतुक केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.