spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धक्कादायक! अधिवेशन संपताच , विधानभवनाच्या शेजारी पकडला गांजा

नागपूर :- विधिमंडळ हिवाळी अधिवेशन संपून दोनही दिवस होत नाहीत तोच विधानभवनाच्या अगदी शेजारी अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी दोन किलो ग्रांजासह दोन तस्करांना अटक केली. या दोघांना गांजा पुरवणारे आणखी दोन तस्कर फरार झाले आहेत. विधानभवनाला लागून असलेल्या मरिअम झोपडपट्टीत पोलिसांनी ही कारवाई केली.

धक्कादायक बाब म्हणजे अधिवेशनासाठी विधिमंडळाच्या परिसरात तगडा फौजफाटा तैनात असतानाही हा गांजा खुले आम विकला जात होता, असाही पोलिसांना संशय आहे. विधानभवनाच्या भिंतीला लागून असलेल्या मिठानिम दर्गाहच्या समोरील मरिअम झोपडपट्टीत किरकोळ गांजा विक्री केली जात असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. अंमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास शोध मोहीम राबवत श्वान पथकाला पाचारण केले. झोपडपट्टीतल्या एका घरात कपाटात लपवून ठेवलेला दोन किलोग्रॅम गांजा गांजा पथकालच्या हाती लागला.

अधिवेशन काळात या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता राज्याचे मंत्री आणि मंत्रिमंडळ याच विधान भवनात सात दिवस मुक्कामी होते. डीपीएस पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या पथकाने ही कारवाई करत गांजाचा साठा जप्त केला आहे.फिरोजा इजाज पठाण (३८) आणि आसिफ अली शौकत अली (५०) अशी गांजा तस्करी करणाऱ्या दोघांची नावे आहेत.

पथकाला फिजोजा हिच्या घरातून हा २ किलोग्रॅम गांजा सापडला आहे. यातला आसीफ अली हा गांजा खरेदी करण्यासाठी आला होता. तोही अंमली पदार्थाचा तस्कर असल्याचा पोलिसांना संशय आहे. हा गांजा या महिलेपर्यंत पोहोचवणारा मुख्य सूत्रधार वसीम उर्फ गब्बर अब्दुल रफिक पठाण आणि बंडू यादव हे सराईत गुन्हेगार आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपीचा शोध सुरू आहे.

Popular Articles