spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवघ्या ३ तासात गोवंश जनावर चोरीचा गुन्हा उघड, ३ आरोपी अटक 

देवलापार :- पोलीस स्टेशन देवलापार अंतर्गत रामनाथ परशूराम कोडापे, रा. सावरा, ता. रामटेक, जि. नागपूर, पोलीस स्टेशन ला रिपोर्ट दिली की त्यांचे घराचे समोरील अंगणामध्ये त्यांनी बांधुन ठेवलेल्या जनावरांना पैकी २ गायी अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्या आहे. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन देवलापार येथे कलम ३०३ (२) भान्यासं अन्वये गुन्हे नोंद आहे.

हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि श्री अनिल म्हस्के, अपर पोलीस पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात आणि रमेश बरकते, उपविभागिय पोलीस अधिकारी, रामटेक यांच्या मार्गदर्शनांत देवलापार पोलीसांनी गुप्तबातमीदारांच्या माहीतीच्या आणि तांत्रिक पुराव्यांच्या अधारे अवघ्या ३ तासात दिनांक १९/१२/२०२५ रोजी आरोपी नामे १) सयद दानिश नासिर पाशा, वय २६ वर्षे, रा. खरपडा ता. रामटेक, जि. नागपुर, २) अब्दुल रहमान सलीम अहमद वय २१ वर्षे, रा. डॉ. शेख बूनकर कॉलनी, कामठी, ता. कामठी जि. नागपुर, ३) मूदस्सीर रजा इज्जाज अहमद, वय २८ वर्षे, रा. कोलसाटाल, नवाब बंडी हाउस जवळ, कामठी यांना खरपडा येथुन ताब्यात घेवुन नमुद आरोपीकडे पोलीसांनी सखोल आणि कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता सदर गुन्हा केल्याबाबत कबुली दिली. देवलापार पोलीसांनी नमुद आरोपीस अटक करून नमुद आरोपीतांकडून गुन्हयात चोरीस गेलेला संपुर्ण मुद्देमाल दोन गायी त्याव्यतीरिक्त ३ गोन्हे आणि गुन्हयात वापरलेले वाहन आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली मारुती ८०० चार चाकी वाहन क्रमांक १९ क्यु ३०३४ असा एकुण किंमती १,२०,०००/-रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ०२ गायी ओळख पटवून फिर्यादी चे ताब्यात दिले व इतर ०३ गोन्हे गौशाळा, देवालापर येथे दाखल करून नमूद तिन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे.

Popular Articles