spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

काँग्रेसने भाजपला फोडला घाम तरीही नगराध्यक्ष पद भाजपच्या खात्यात, नगराध्यक्षपदी पियुष बुरडे विजयी

– उपाध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवाराची भूमिका ठरणार निर्णायक

खापा :- नगर परिषदांच्या निवडणुकीचा निकाल रविवारला जाहीर झाला. यात खापा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाकरिता भाजपचे पियुष बुरडे मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले. तर नगरसेवक सदस्यांमध्ये काँग्रेसचे १० , भाजप ९ तर अपक्ष १ उमेदवार निवडुन आले. खापा नगर परिषदेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नगराध्यक्ष पदाकरिता भाजप, काँग्रेस, शिवसेना (शिंदेगट) यांच्या तिरंगी लढतीत, भाजपने नगराध्यक्ष पदावर कब्जा केला. काँग्रेसने या निवडणुकीत भाजपला चांगलाच घाम फोडला असून नगराध्यक्ष पद हे भाजपच्याच खात्यात केले.

काँग्रेसचे रविंद्र कवडे यांना २४३० मते, शिवसेना शिंदेगटाचे खेमराज बारापात्रे यांना २७११ तर, भाजपचे पियुष बुरडे यांनी ३६५२ मते घेत विजय मिळवला. यात शिवसेना शिंदेगटाचे खेमराज बारापात्रे यांचा भाजपाचे पियुष बुरडे यांनी ९४१ मतांनी पराभव करून दणदणीत विजय संपादन केला. तर काग्रेसचे रवींद्र कवडे हे तिसऱ्या स्थानी राहिले. काँग्रेसचा नगराध्यक्ष तिसऱ्या क्रमांकावर असला तरी मागील निवडणुकीत काग्रेसला फक्त १ जागा मिळाली होती. पण या निवडणुकीत काँग्रेसने मोठी मुसंडी मारत २० पैकी १० जागांवर विजय मिळवला. तर भाजपाला ९ जागा मिळाल्या.

उमेदवार विजयी होताच कार्यकर्त्यांनी शहरात जोरदार मिरवणूक काढली. भाजपाच्या समर्थकांनी शहरात मोठी विजयी मिळवणुक काढत विजयाचा मोठा जल्लोष साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता.

“क्रॉस वोटिंग ठरले निर्णायक”

शहरात क्रॉस वोटिंगची चांगली चर्चा होती. याचा फायदा सर्वस्वी भाजपाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला झाल्याचं दिसून येत आहे. क्रॉस वोटिंग मुळे भाजपच्या पदरात नगराध्यक्ष पद पडले. तर 11 जागेवर भाजपला हार पत्करावी लागली.

“उपाध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवाराचा निर्णय ठरेल निर्णायक”

एका जागेवर प्रभाग क्र. ७ (ब) मध्ये अपक्ष उमेदवार सुनिल पाहुने विजयी झाले. काँग्रेसचे १० उमेदवार विजयी झाले. तर भाजपचे ९ उमेदवार विजयी झाले आहे. त्यामुळे अपक्ष निवडून आलेल्या उमेदवाराची भूमिका उपाध्यक्ष पदासाठी निर्णायक ठरणार आहे. पाहुणे हे आमदार आशिष देशमुख व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जवळचे मानले जातात. पाहुणे यांनी भाजपकडून दावेदारी केली असून मागील रेझीममध्ये उपाध्यक्ष पद भूषवलेले अमोल भुते यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज पाहुणे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. त्यात भुते यांनी 234 मते घेतली तर, पाहुणे यांनी 360 मत घेऊन भुते यांची चांगलीच मुसंडी केली. जर पाहुणे काँग्रेसकडे वळले तर काँग्रेसकडे 11 उमेदवार होईल आणि उपाध्यक्षपद काँग्रेसच्या खात्यात जाईल. जर पाहुणे हे भाजपकडे वळले तर त्यांना भाजपकडून उपाध्यक्ष पदाची संधी प्राप्त होण्याचे संकेत दोन्ही बाजूने संकेत दिसत आहे. यावरून खापा नगरपालिकेवर उपाध्यक्ष पदाचा कोण झंडा फडकविणार याकडे सर्व शहरवासीयांचे लक्ष लागलेले आहे.

नगर परिषद खापा निवडणूक २०२५

प्रभाग क्रमांक – 1 

विजयी उमेदवार काँग्रेस – गणेश दवडूजी आके,

विजयी उमेदवार भाजप – वैशाली चंद्रकांत लिखार

प्रभाग क्रमांक – २

विजयी उमेदवार काँग्रेस – प्रेमीला ओंकार बोकडे

विजयी उमेदवार काँग्रेस – आशिष सुरेश ढाले

प्रभाग क्रमांक ३

विजयी उमेदवार काँग्रेस – मनोरमा विठुजी श्रीयाम

विजयी उमेदवार काँग्रेस – संजय संभाजी सोनकुसळे

प्रभाग क्रमांक – ४

विजयी उमेदवार भाजप – बाल्या किशोर रमेश आष्टनकर

विजयी उमेदवार काँग्रेस – कविता स्वप्निल धराडे

प्रभाग क्रमांक – ५

विजयी उमेदवार भाजप – अंजली आनंद मेनकुदळे

विजयी उमेदवार काँग्रेस – मिलिंद प्रभाकर बुरडे

प्रभाग क्रमांक – ६

विजयी उमेदवार भाजप – प्रशांत अशोक तुमाने

विजयी उमेदवार काँग्रेस – वैशाली अखिल लाड

प्रभाग क्रमांक – ७

विजयी उमेदवार भाजप – शोभा हरिभाऊ कनाकर (मानकर)

विजयी उमेदवार अपक्ष – सुनील सुधाकर पाहुने

प्रभाग क्रमांक – ८

विजयी उमेदवार भाजप – निशा राजू कठौते

विजयी उमेदवार भाजप – निखिल ज्ञानेश्वर आष्टणकर

प्रभाग क्रमांक – ९

विजयी उमेदवार कांग्रेस – लीलाबाई कमलेश बागडे

विजयी उमेदवार कांग्रेस – नामदेव हेमाजी गजभिये

प्रभाग क्रमांक – १०

विजयी उमेदवार भाजपा – रवि गेंदालाल परतेकी

विजयी उमेदवार भाजपा – रोशनी शेखर डेरे

Popular Articles