spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मौदा नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी प्रसन्ना (राजा) तिडके विजयी

किशोर साहू, मौदा :- रविवार दिनांक 21 डिसेंबरला झालेल्या मतमोजणीत मौदा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदावर प्रसन्ना (राजा )तिडके 871 मतांनी विजयी झाले. यापूर्वी राजा तिडके व त्यांचे वडील बाबुराव तिडके कोणत्याही निवडणुकीत कधीही जिंकलेले नव्हते, असे चाचेर येथील काँग्रेसचे कार्यकर्ते गणेश बावनकुळे यांनी सांगितले. त्यामुळे अखेर आज नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी होऊन तिडके परिवाराने निवडणूक जिंकण्याच्या श्रीगणेशा केला.

उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या मुदतीच्या दोन दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव व नेहमी निवडणूक हरणारे प्रसन्ना ( राजा) तिडके यांनी राजकीय भूकंप करत कधीही निवडणूक न हरणाऱ्या महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोराडी येथे भाजपात प्रवेश करून मौदा नगरपंचायतच्या भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून निवडणुकीत अर्ज दाखल करताच, सोशल मीडियावर व तालुक्यातील गावागावात रामटेक लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा होत होती. रामटेक लोकसभेच्या निवडणुकीतही काँग्रेसचे उमरेड चे आमदार राजू पारवे यांनी निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या धनुष्यबाण हाती घेऊन लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले होते. मात्र ते हरले होते. तीच पुनरावृत्ती मौदा नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत होणार असल्याचे भाकीत तालुक्यातील अनेक राजकीय जानकार सोशल मीडियावर व गावागावात वर्तवित होते. त्यामुळे राजा तिडके यांच्या राजू पारवे होणार असल्याचे तर्क लावण्यात येत होते. त्यामुळे या निवडणुकीकडे तालुका, जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलेले होते.

मात्र आज आलेल्या निकालाने राजा तिडके यांच्या राजू पारवे झाला नसून आशिष देशमुख झाल्याची चर्चा तालुक्यात राजकीय जाणकार वर्तवित आहेत. सावनेर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आशिष देशमुख यांनी भाजपा प्रवेश करून काँग्रेसचे दिग्गज माजी मंत्री सुनील केदार यांच्या पराभव केला होता.

मौदा नगरपंचायत च्या एकूण 17 वार्डातून काँग्रेसचे 11 भाजपचे 4 तर स्वतंत्र 2 उमेदवार निवडून आले आहेत. नगराध्यक्ष पदावर तिडके विजयी झाल्याने त्यांच्यावर प्रत्यक्ष भेटून,सोशल मीडियावर स्टेटस च्या माध्यमातून शुभेच्छांच्या वर्षाव सुरू आहे. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये माजी जि प सदस्य कैलास बरबटे, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संजू वाघमारे,वीरेंद्र पायतोडे, खंडाळा (गांगणेर) सरपंच, आरोग्य सभापती तथा भाजपा किसान आघाडी जिल्हा महामंत्री संकेत झाडे, ग्रामपंचायत बोरीघिवारी सरपंच विशाल सेलोकर ,गांगनेर (हिवरा )उपसरपंच मोतीराम घरजाळे, नरसाळा उपसरपंच सचिन राऊत,बाबदेव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाघमारे, ग्रामपंचायत तारसा माजी सरपंच आनंद लेंडे, कोदामेंढी येथील भाजपचे कार्यकर्ते राहुल रामचंद्र हटवार सह तालुक्यातील अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे शुभेच्छांच्या वर्षाव सुरू आहे.

Popular Articles