spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मौदा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत बोरगाव केंद्र सलग चार वेळा चॅम्पियन

किशोर साहू, मौदा, ता. २२ :- बालकांचा सर्वांगीण विकासाचा उद्देश साध्य करण्याकरिता बौद्धिक व मानसिक विकासासोबत विद्यार्थ्याच्या शारीरिक विकास होण्याच्या दृष्टीने दरवर्षी जिल्हा परिषद तर्फे केंद्र, तालुका,विभाग व जिल्हा स्तरावर सांघिक व वैयक्तिक स्तरावर स्पर्धा आयोजित केल्या जातात.याचाच नेहमीचा भाग म्हणून मौदा तालुका अंतर्गत दिनांक 19 व 20 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिरव्हा,केंद्र.बोरगाव, येथील प्रांगणात मौदा तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

उद्घाटन माजी सरपंच चांगो तिजारे यांचे हस्ते ध्वज फडकावून व क्रीडामशाल प्रज्वलित करून रीतसर करण्यात आले .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिरव्हा ग्रामपंचायत सरपंच विनायक शहारे व प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोशन ठोंबरे हे होते. याप्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.

बक्षीस वितरण कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माजी आमदार टेकचंद सावरकर तसेच माजी जि.प. अध्यक्ष्या निशा सावरकर,गटविकास अधिकारी डॉ. महेश बेहेकर उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी संकेत मरसकोल्हे, शिक्षण विस्तार अधिकारी ललिता चामट, रामेश्वर भक्तवर्ती व सर्व केंद्रप्रमुख याप्रसंगी उपस्थित होते.

तालुक्यातील एकूण बारा केंद्रातील सर्व चमुनीं यात सहभाग घेतला. यापैकी केंद्रप्रमुख केंद्र बोरगाव जुगलकिशोर बोरकर यांचे नेतृत्वात एकूण चार सांघिक व तीन वैयक्तिक खेळ प्रकारात प्रथम स्थान घेऊन सलग चौथ्यांदा बोरगाव केंद्राने चॅम्पियनशिप मिळवून मौदा तालुक्यात अव्वल स्थान पटकावले.यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिरव्हा सहित सर्वच शाळांनी आपले उत्तम योगदान दिले.

Popular Articles