– नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व लोकहितांसाठी 17 पक्ष एकत्रित येऊन मनपा निवडणूक लढविणार – अहमद कादर
– भारतीय जनता पार्टी व काँग्रेस यांना उत्तम पर्याय देण्यासाठी नागपूर परिवर्तन मोर्चाची बांधणी !
नागपूर :- नगरपरिषद व नगरपंचायत च्या निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागल्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये 17 पक्षांनी धाव घेतली. आप आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. जय विदर्भ पार्टीचे अध्यक्ष अरुण केदार यांनी विदर्भ वेगळा झालाच पाहिजे ? अशी घोषणा केली आणि सांगितल्या गेलं की, देवेंद्र विदर्भ देणार नाही परंतु आम्ही केंद्रातून घेऊ हा ठाम निर्णय घेऊन सतरा पक्षीय घोषणा एकत्रित करून येणारी मनपा निवडणूक लढविणार असल्याचे यावेळी सांगितले. नागपूर शहरांमध्ये बेरोजगारी, निकृष्ट आरोग्य व्यवस्था, शिक्षणाचा घसरलेला दर्जा, वाढता भ्रष्टाचार, अनियोजित विकास, झोपडपट्ट्यांचे प्रश्न, पाणी, रस्ते स्वच्छतेची दुरवस्था अशा मूलभूत समस्यांनी ग्रस्तलेला आहे. त्यासाठी नागपूर परिवर्तन मोर्चाची बांधणी झाली असून येणारी एनएमसीची निवडणूक सतरा पक्षासह एकत्रित येऊन लढणार असल्याची माहिती अहमद कादर यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) बहुजन रिपब्लिकन एकता मंच, प्रहार संघटना, जय विदर्भ पार्टी, आजाद समाज पार्टी, देश जनहित पार्टी, संयुक्त रिपब्लिकन पार्टी, केंद्रीय ग्रामसभा, वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया, संयुक्त रिपब्लिकन आघाडी, ओबीसी बहुजन आघाडी, फॉरवर्ड ब्लॉक, रिपब्लिकन लोकशाही मोर्चा, कास्ट्राईब संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ (खोरीपा), कुणबी सेना, आणि नाग विदर्भ आंदोलन समितीच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक घोषणा करून येणाऱ्या महापालिकेच्या 38 प्रभागांमध्ये परिवर्तन मोर्चासह बांधणी करत निवडणूक लढविणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. परिषदेला उपस्थित मंचावरील माजी आमदार प्रकाश गजभिये, अरुण केदार, अहमद कादर, तात्यासाहेब मते, श्रीकांत धोटे, सुनील चोखारे, बाळू मेश्राम, अमृत गजभिये, प्रकाश गजभिये, प्रवीण राऊत, मुकेश मासुरकर, धनराज फुसे, रफिक शेख, रुपेश बागेश्वर, जॉनी स्टॅन्ली रायबोरडे यांची उपस्थिती होती.








