spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

१५ ऑक्टोबंर पासुन जय महाकाली मंदिरात नवरात्रौत्सव

कन्हान :- नदी काठावरील पावन जय महाकाली मंदीर सत्रापुर रोड कन्हान येथे गुरूवार (दि.१५) ऑक्टोंबर पंचमी ला सकाळी घटस्थापना करून नवरात्रौत्सवाची सुरूवात करण्यात येणार आहे.

जय महाकाली सेवा समिती सत्रापुर, कन्हान व्दारे पावन कन्हान नदी काठावरील ‘ क ‘ तिर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त जय महाकाली मंदिर सत्रापुर रोड कन्हान येथे पंचमी गुरूवार(दि.१५) ऑक्टोंबर २०२६ सकाळी १० वाजता कन्हान नदी पात्रातील पावन जल आणुन सनद गुप्ता यांचे हस्ते विधीवत पुजा, अर्चना आणि घटस्थापना करून नवरात्रौत्सवाची सुरूवात करण्यात येणार आहे. नव दिवस सकाळ, संध्याकाळी आरती व प्रसाद वितरण करण्यात येईल. दररोज भजन, जस गायन सह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून शुक्रवार (दि.२३) ऑक्टोंबर ला सकाळी ९ वाजता भजन, जस गायना सह वाज्यागा ज्यात मातेचा जय घोष करित पावन कन्हान नदीच्या पात्रात घटविसर्जन करून महाप्रसाद वाटप करण्यात येऊन नवरात्रौत्सव थाटात साजरा करण्यात येणार आहे.

नागपुर जिल्हयासह विदर्भ आणि मध्य प्रदेशातुन दरवर्षी दुरदुरवरून जय महाकाली च्या दर्शनास भाविक मंडळी मोठया संख्येने येतात. करिता या नव रात्रौत्सवात भाविकांनी मोठया संख्येने जय महाकाली मंदीर सत्रापुर रोड कन्हान येथे उपस्थित होऊन जय महाकाली मातेचे दर्शन घेऊन पुण्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन मा. प्रकाश कडु सचिव जय महाकाली सेवा समिती सत्रापुर, कन्हान हयानी केले आहे.

Popular Articles