spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दादासाहेब बालपांडे कॉलेजच्या प्लेसमेंट ड्राइव्हला उत्स्फूर्त प्रतिसाद; १०५ उमेदवारांना रोजगाराची संधी

– १,९०० उमेदवारांची नोंदणी; ६०० हून अधिक उमेदवारांचा सहभाग

नागपूर :- बेसा येथील, दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रशिक्षण व प्लेसमेंट सेलतर्फे ७ ऑक्टोबर रोजी आयोजित पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमासाठी डी. फार्म, बी.फार्म. आणि एम. फार्म. पात्रता असलेल्या १,९०० उमेदवारांनी नोंदणी केली, तर ६०० हून अधिक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखत प्रक्रियेत सहभाग घेतला. यापैकी १९७ उमेदवारांची पुढील निवड प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून, सुमारे १०५ उमेदवारांना रोजगाराची संधी मिळाली. या भरती उपक्रमात Chemfild Cellulose Pvt. Ltd., Shree Baidyanath Ayurved Bhavan Pvt. Ltd., Nitika Pharma, Apollo Pharmacy, Unijules Life Sciences आणि CV Healthcare Pvt. Ltd., Nagpur या नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. उत्पादन, गुणवत्ता हमी, गुणवत्ता नियंत्रण, संशोधन व विकास, केमिस्ट, फार्मासिस्ट आणि बिझनेस एक्झिक्युटिव्ह अशा विविध पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. कंपन्यांच्या मानव संसाधन व्यवस्थापकांनी आणि तांत्रिक तज्ज्ञांनी उमेदवारांचे शैक्षणिक ज्ञान, तांत्रिक कौशल्ये व व्यावसायिक पात्रतेच्या आधारे निवड प्रक्रिया राबविली. तसेच विद्यार्थ्यांना औषधनिर्माण व आरोग्यसेवा क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि उद्योगक्षेत्राच्या अपेक्षांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमाचे समन्वयन महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापक तथा प्रशिक्षण व प्लेसमेंट सेलच्या सचिव डॉ. संध्या बागडे यांनी केले. अंबे दुर्गा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मनोज बालपांडे आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्ज्वला महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ.विद्या साबळे, डॉ. अजय पिसे, डॉ. अमोल वारोकार, डॉ. पी.एस.गंगणे, डॉ. मंगेश गोडबोले, डॉ. रितेश फुले, डॉ.सचिन मोरे, डॉ. अश्विनी इंगोले, सचिन मेंढी, डॉ.देवेश्री नांदुरकर, सुश्री मंजुषा चारडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या प्लेसमेंट ड्राइव्हमुळे फार्मसी क्षेत्रातील पात्र उमेदवारांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत झाली.

Popular Articles