नागपूर :- बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या दक्षिण विभागाच्यावतीने वेळाहरीला भेट देऊन प्राचीन बौद्ध संस्कृतीची माहिती घेण्यात आली. नागपूर पासून 12 किलोमीटर अंतरावर वेळा हरी या गावामध्ये 2000 वर्षे जुने मौर्यकालीन विहार खोदकामात सापडले आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने हा परिसर ताब्यात घेतला असून मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी या ठिकाणी भेट देत आहेत. बौद्ध संस्कृतीचा वारसा जतन करून परिसराचा विकास करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात येत आहे. यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या विदर्भ सचिव ज्योती तिरपुडे, शहर अध्यक्ष मिलिंद डांगे, शहर सचिव प्रसेनजीत गायकवाड, दक्षिण विभागाच्या अध्यक्ष वंदना जीवने, सरचिटणीस प्रिया नत्थुजी खोब्रागडे/कांबळे, दक्षिण पश्चिम अध्यक्ष कोचे तसेच न्यू स्वराज नगर बेसा पिपळा मधून जय भीम मित्र परिवारा मधील सर्व धम्म उपासक -उपासिका यावेळी उपस्थित होत्या. त्यात अजय गजभिये , राष्ट्रपाल ढाेके, भोजराज दुर्गे, रवी कुंभारे, प्रेरणा रमेश नितनवरे, रक्षा ईशांत गुढे, चेतना अरुण कांबळे, अनुप रामटेके, स्वाती राष्ट्रपाल ढोके, ज्योत्स्ना सिद्धार्थ नितनवरे, इंजि.सचिन कार्तिक कांबळे , समीक्षा राहुल सातपुते, करिष्मा कुंभारे, तसेच हिंगणा व नाईक नगरच्या काही उपासक -उपासिका उपस्थित होत्या.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या दक्षिण विभागातर्फे वेळाहरीला भेट देऊन प्राचीन बौद्ध संस्कृतीची माहिती घेतली









