spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जनावरांची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद २९ गोवंश जनावरांची सुटका

बेला :- बेला पोलीसांना माहीती प्राप्त झाली की, अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतुक केली जात आहे. अशी माहीती मिळताच पोलीसांनी सदर वाहन शोध कामी पेट्रोलींग केली असता मौजा साल्लेभट्टी बस स्टॉप शिवारात एक संशयीत टाटा कंपनीचे आयशर क्र. एम एच ३५ ए. जे २०१६ हे वाहन दिसुन आले. पोलीसांना पाहुन सदर वाहन चालकाने त्याचे वाहन बस स्टॉप जवळील जंगलात वळविले पोलीसांनी नमुद वाहनाचा पाठलाग केला असता आरोपी वाहन सोडून पळुन गेले. पोलीसांनी पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये २९ गोवंश जनावरे मिळुन आले. नमुद जनावरांना कोणतीही चारापाण्याची सोय न करता, अंत्यत कमी जागेत दाटीवाटीने कोबुन, शिंगाला व पायाला आखुड दोरखंडाने बांधुन वाहतुक करीत असल्याचे दिसुन आले. पोलीसांनी पंचासमक्ष घटनास्थळावरून एक टाटा कंपनीचा आयशर क्र. एम एच ३५ ए. जे २०१६ किंमती १५,००,०००/- रूपये आणि २९ गोवंश जनावरे किंमती २,५६,०००/- रूपये असा एकुण किंमती १७,५६,०००/- रूपयाचा मुददेमाल जप्त केला.

नुमद प्रकरणी वाहन चालक आणि मालक आरोपीतांविरूध्द प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, भान्यासं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Popular Articles