spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रचंड प्रतिसादामुळे रेल्वेगाड्यांना मुदतवाढ

अकोला :- गर्दी व उत्सवाच्या काळात प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभणाऱ्या रेल्वे गाड्यांची मुदत लवकरच संपुष्टात येत होती. या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला. मध्य रेल्वेने विदर्भात नाशिकसाठी सुटणाऱ्या अनारक्षित रेल्वे गाडीला मुदतवाढ दिली. दक्षिण मध्य रेल्वेने उत्तर व दक्षिण भारताला जोडणाऱ्या एका विशेष गाड्याच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. रेल्वेच्या दोन विभागांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सुट्टीतील गर्दीच्या काळात प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

मध्य रेल्वेकडून बडनेरा-नाशिक रोड अनारक्षित विशेष गाडीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढलेली गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने बडनेरा – नाशिक रोड अनारक्षित विशेष गाडीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा – नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष पूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत चालविण्याचे अधिसूचित करण्यात आले होते. ती आता १ जानेवारी २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत वाढविण्यात आली आहे. या गाडीच्या एकूण ५९ फेऱ्या होणार आहेत. तसेच गाडी क्रमांक ०१२१२ नाशिक रोड – बडनेरा अनारक्षित दैनिक विशेष ही पूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत चालविण्याचे अधिसूचित करण्यात आले होते. ती गाडी आता ०१ जानेवारी २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वाढविण्यात आली आहे. या गाडीच्या ही एकूण ५९ फेऱ्या होणार आहेत. या दोन्ही गाड्यांच्या वेळापत्रकात, संरचनेत व थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

तिरुपती – हिसार – तिरुपती विशेष एक्सप्रेसला मुदतवाढ

प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करीत व गर्दीचा ताण कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या तिरुपती – हिसार – तिरुपती विशेष एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०७७१७ तिरुपती – हिसार दर बुधवारी चालविण्यात येते. त्याची मुदत २४ डिसेंबरपर्यंत होती. आता या गाडीला ३१ डिसेंबर २०२५ ते ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या गाडीच्या सात फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०७७१८ विशेष हिसार – तिरुपती दर रविवार धावते. या गाडीची मुदत २८ डिसेंबरपर्यंत होती. आता या गाडीला ४ जानेवारी २०२६ ते १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ मिळाली. या गाडीच्या देखील सात फेऱ्या होणार आहेत. या गाड्या पूर्वीच्याच वेळापत्रकानुसार धावणार आहेत.

Popular Articles