spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपातर्फे साने गुरुजी यांना विनम्र अभिवादन

नागपूर :- थोर साहित्यिक व स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सदाशिव साने उपाख्य साने गुरुजी यांच्या १२६ व्या जयंती दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. मनपातर्फे गांधीबाग येथील चाचा नेहरु उद्यानात आयोजित छोटेखानी समारंभात साने गुरुजी यांच्या पुतळयाला माल्यापर्ण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर मनपा मुख्यालयातील ज्येष्ठ नागरिक कक्षात साने गुरुजी यांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी सिनीयर सिटीझन कौन्सिल ऑफ नागपूर जिल्हाचे अध्यक्ष मनोहर खर्चे, काशिनाथ धांडे, श्रीराम बांधे भगवान टिचकुले, देवराव सवाईथुल, अँड. मनोहर उपासे, कमल तायडे यांच्यासह इतर ज्येष्ठ नागरिक मंडळी उपस्थित होते.

Popular Articles