spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

रोजगार मुद्यावर आंदोलन करणाऱ्या नागरिकांन वर पोलीसांचा लाठीचार्ज व अटक

– सरपंच, उपसरपंच, सदस्य सह महिलांना आणि नागरिकांना अटक, तनावाची स्थिती निर्माण. 

– हे राज्य लोकशाहीचे की हुकूमशाहीचे ? रोजगार मागणे हा गुन्हा आहे का ? 

कन्हान :- पारशिवनी तालुक्यातील घाटरोहणा ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या महाजनको कन्व्हेयर बेल्ट प्रकल्पात स्थानिकांना रोजगार देण्याचा मुद्यावरुन आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर पोलीसांनी लाठी चार्ज केला. घाटरोहणा ग्राम पंचायत सरपंच किशोर मेहुणे, उपसरपंच अशोक पाटील यांचा सह शैकडो महिला, नागरिकांना व आंदोलनकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याने हे राज्य लोकशाहीचे की हुकूमशा हीचे ? रोजगार मागणे हा गुन्हा आहे का ? गावात तनावाची स्थिती निर्माण झाली आहे.

महाजनको कन्व्हेयर बेल्ट प्रकल्पात स्थानिकां ना रोजगार देण्याचा मागणीसाठी २४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत सरपंच किशोर मेहुणे यांचा नेतृत्वात बेमुदत आंदोलन केले होते. ज्यावर प्रकल्पाचे मुख्य अभियंता कुमारवार, कनिष्ठ अभियंता राठोड यांनी २६ सप्टेंबर ला कंपनीच्या कार्यालयात पारशिवनीचे तहसिलदार, कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यां चा उपस्थितित आंदोलकांच्या शिष्ठमंडळाची बैठक बोलवुन सकारात्मक चर्चा करुन मागण्या मान्य केल्या . प्रोजेक्ट फेजमध्ये कंत्राटदाराकडे तात्काळ ८ तरुणांना रोजगार देण्यात येईल आणि उर्वरित ८ तरुणांना एका महिन्याचा अंतरावर जागेच्या उपलब्धतेनुसार घेण्यात येईल असे लिखित स्वरुपात पत्र दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले होते. मुख्य अभियंता कुमारवार यांनी दिलेल्या पत्रानुसार चार महिने लोटुन सुद्धा अद्यापही स्थानिकाला रोजगार उपलब्ध करुन दिले नाही.

सरपंच किशोर मेहुणे, उपसरपंच अशोक पाटील आणि ग्रामस्थांनी अधिकार्यांची भेट घेऊन चर्चा देखिल केली. परंतु अधिका-या कडुन उडवाउड वीची उत्तरे मिळत असल्याने ग्रामस्था मध्ये तीव्र रोष निर्माण झाला. शासनाच्या २००८ च्या जी.आर.नुसार कोणत्याही ठिकाणी खाजगी किंवा सरकारी प्रकल्प, कंपन्या, कारखाने सुरु झाले असल्यास किमान ५०% जागा स्थानिक लोकांसाठी राखीव असतात. मात्र प्रशासन आपल्याच निर्णयांची उल्लंघण करून बाहे रील लोकांना रोजगार देत आहे आणि स्थानिक लोकां चे रोजगार हिसकावत आहे, असे ग्रामस्थाना कडुन बोलले जात आहे. या मुद्यावरुन बुधवार (दि.२४) डिसेंबर ला सरपंच किशोर मेहुणे यांचा नेतृत्वात शैक डो नागरिक महाजनको कन्व्हेयर बेल्ट प्रकल्पा समोर आंदोलन करणार होते. परंतु पोलीस विभागाने आंदो लन सुरु होण्यापुर्वीच सरपंच किशोर मेहुणे यांना त्यांचे निवास स्थावरुन अकट केल्याने आंदोलन कर्त्यांनी आक्रमक भुमिका घेत आंदोलन सुरु केले. बघता बघता आंदोलन उग्र झाल्याने पोलीसांनी आंदो लकांवर लाठीचार्ज केला. उपसरपंच अशोक पाटील, सदस्य तेजराम सरीले, सिद्धार्थ पाटील, सुनील पाटील , अमीत छानीकर, प्रशांत वाटकर, संजय छानीकर, आशा लोखंडे, सुनीता तांडेकर, केशरबाई बेहुणे,ज्योती भतोडे, दुर्गा पाटील, सुनंदा निस्तानी, लता छानीकर, सुशीला बोंद्रे, प्रमीला पाटील, शालु पाटील सह शैकडो महिलांना व आंदोलनकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. यामुळे गावात तनावाची स्थिती निर्माण झाली आहे. बातमी लिहे पर्यंत अटक केलेल्या आंदोलनक र्त्यांना पोलीसांनी अद्यापही सोडले नाही, गावात ग्राम स्थांनी आंदोलन सुरुच ठेवले असुन अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलीसांनी तातडीने सोडुन स्थानि कांना तातडीने रोजगार देण्याची मागणी केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.