spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सूर्यलक्ष्मी कॉटनमिलच्या व्यवस्थापनाला प्रत्यक्ष भेट देऊन माजी आमदार टेकचंद सावरकर यांनी कामगारांच्या समस्या सोडविण्याचे दिले निर्देश 

किशोर साहू, मौदा, तारीख 25 :- बुधवार ( दि. 24 डिसेंबर)ला सूर्यालक्षमी कॉटन मिल येथे माजी आमदार टेकचंद सावरकर यांनी भेट देऊन कामगारांचा विविध समस्या जाणून घेतल्या .ज्या मध्ये प्रामुख्याने कामगारांचा करारनामा व इतर बाबीवर चर्चा करण्यात आली . कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाला सुचित केले. कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेहमी कामगारांचा सोबत असल्याचे सुतोवाचित त्यांनी याप्रसंगी केले.

यावेळी माजी जि. प. सदस्य कैलास बरबटे, कंपनी व्यवस्थापाचे सिईओ शर्मा तसेच कामगार संघटनेचे अध्यक्ष रेवनाथ मदनकर , सचिन भिवगडे, रामू तांडेकर,सावनकुमार पुंडे,वैभव पडोळे,देवराव ठाकरे, सनत दसरे,पुरुषोत्तम आंबीलढुके,बंडू टोपले,देवचंद चकोले, राजेश बचेरे सर्व पदाधिकारी तसेच कामगार रुपचंद आंबीलढुके,राजकुमार मेहर आदि उपस्थित होते.

Popular Articles