spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात पीएम श्री जि प शाळा दहेगाव च्या विद्यार्थ्यांनी केले उत्कृष्ट प्रदर्शन 

किशोर साहू, मौदा ,ता. २६:- तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2025 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिरव्हा येथे संपन्न झाले. यात पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले.

बुद्धिबळ स्पर्धेत सृष्टी अहिरकर या विद्यार्थ्यीनीने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच प्रत्येक मेहर या विद्यार्थ्यांने कुस्ती या स्पर्धेत प्रथम क्रमांक , 100 मीटर स्पर्धेत शौर्य मलेवार या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक ,खो खो मुली वरिष्ठ गट या स्पर्धेत द्वितीय क्रमांक , समूहगीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरणांचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार टेकचंद सावरकर ,माजी अध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर निशा सावरकर , गटविकास अधिकारी महेश बहेकर, गटशिक्षणाधिकारी संकेत मरसकोल्हे यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला .या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी ललीता चामट, शिक्षण विस्तार अधिकारी रामेश्वर भक्तवर्ती , तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख यांच्या हस्ते विजेत्या चमुना बक्षीस वितरण करण्यात आले. पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव च्या सर्व विजेत्या खेळाडूंचे मुख्याध्यापक वासुदेव भुते व धानला केंद्राचे केंद्रप्रमुख राजू आंबिलकर ,गट ग्रामपंचायत दहेगाव च्या सरपंच भारती संदीप आबिलढुके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे , उपाध्यक्ष रणधिर आंबीलढुके , सर्व सदस्यगण , पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथील सर्व शिक्षकवृंद राजेश रोहाड, लीलाधर काळबांडे, सुधीर कांबळे , सुधीर खंडाईत, सुजाता बोदेले , प्रज्ञा रामटेके , संगीता आंबिलढुके , उमेश उके, पुष्पलता उके, कैलास फटिंग यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

Popular Articles