नागपूर :- आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सी आय टी यू नागपूर जिल्हा तर्फे २५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिनानिमित्त नागपूरच्या संविधान चौकात मनुस्मृति ला नाकारून भारतीय संविधान जे प्रत्येक नागरिकांना समानतेचा अधिकार देतो त्यालाच आम्ही स्वीकारतो. आमच्या भारत देशात जातीच्या आधारावर निर्माण करण्यात येणारे राष्ट्र किंवा मनुस्मृती आम्ही स्वीकार करणार नाही. जातीचे राजकारण शासनकर्त्यांनी बंद करावं हा संदेश आज संविधान चौकात देऊन मनुस्मृतीच्या निषेध करण्यात आला. युनियनचे अध्यक्ष कॉ. राजेंद्र साठे यांनी सांगितले कि, मनुस्मृतीमध्ये २६ जानेवारी १९५o चे भारतीय संविधान निर्माण करण्यापूर्वी मनुस्मृतिद्वारे महिलांना तसेच आदिवासी व मागासवर्गीयांना दुय्यम दर्जा दिल्या जात होता. त्यांना शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या संधी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे मनुस्मृतीला नाकारून २५ डिसेंबर १९२७ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीला नाकारत महाड येथे त्याचे दहन केले. भारतामध्ये राहणाऱ्या महिला असो किंवा पुरुष कोणत्याही जाती धर्माच्या असो त्यांना समानतेच्या अधिकार मिळावा असा संदेश त्यांनी दिला. वरील दिनाचे औचित्य साधून देशभर मनुस्मृति दहन दिन त्याला नाकारून त्याचे दहन केले जाते. कार्यक्रमाला प्रामुख्याने कॉम्रेड राजेंद्र साठे, कॉम्रेड प्रीती मेश्राम, कॉम्रेड प्रमोद कावळे, गीता मेश्राम, लक्ष्मी मोरे, नालंदा गणवीर, सुजाता वासनिक, अनिता बागडे, संघमित्रा चव्हाण, पुष्पा टेंभरे, शीतल गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.








