spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद,कळमेश्वर पोलीसांची कामगिरी

कळमेश्वर :- कळमेश्वर पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा खडगाव येथे काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन धाड टाकली असता आरोपी नामे १) रवी अशोक मेश्राम, वय ३१ वर्ष, रा. जुनी वस्ती, दाभा नागपुर २) आशिष मधुकर सोमकुवर, वय ३८ वर्ष, रा. पारडी नागपुर ३) पांडया उर्फ अक्षय प्रेमलाल परतेकी, वय २६ वर्ष, रा. फुटाळा ४) नितीन हरिदास उके, वय २८ वर्ष, रा. वैभव नगर, नागपुर वाडी ५) मोनु अशोक धुरीया, वय ३५ वर्ष, रा. सुरक्षा नगर, दत्तवाडी नागपुर हे ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळतांना जागीच मिळुन आले. आरोपीतांच्या ताब्यातुन तासपत्ते व रोख रक्कम १२,४००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

नमुद आरोपी क्र. १ ते ५ यांच्या विरूद्ध पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Popular Articles