spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पर्यावरणास अपायकारक व मानवी जिवीतास धोकादायक असणारा प्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद

नरखेड :- नरखेड पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, रमना झोपडपट्टी, नरखेड येथे राकेश शामरावजी उईके, वय ४२ वर्ष, रा. रमना झोपडपट्टी, नरखेड हा आपले राहते घरी प्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्री करीत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे नरखेड पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि आरोपीच्या घराची पंचासमक्ष घरझडती घेतली असता घराचे बाहेरील खोलीत नायलॉन मांजा प्लॉस्टीक चक्रीमध्ये गुंडाळलेले मिळुन आला. आरोपीचे ताब्यातून एकुण ०५ नग नायलॉन मांजा प्लॉस्टीक चक्री किंमती ३,०००/- रूपये असा एकुण ३,०००/- रूपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे.

नमुद प्रकरणी आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन नरखेड येथे कलम १२५, २२३ भा.न्या.सं. सहकलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Popular Articles