किशोर साहू, मौदा, ता.२९ :- यंदा पावसाळ्यात वारंवार मुसळधार पाऊस झाल्याने, पिंपळगाव ते महालगाव दरम्यानच्या नाल्यावरील पूल वाहून गेलेला होता. त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी व वाहन चालकांना पाचपट फेऱ्याने प्रवास करावा लागत असल्याने कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येची तातडीने दखल घेत भाजपा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल यांनी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना या पुलाचे दुरुस्ती बाबत निवेदन दिले व अखेर या पुलाच्या दुरुस्तीचे काम नुकतेच पूर्ण झालेले असून या पुलावरून वाहतूक सुरळीत सुरू झालेली आहे त्यामुळे पिपळगाव, महालगाव परिसरातील विद्यार्थी, शेतकरी व वाहन चालकांनी भाजपा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल सह महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले.
…….अखेर पिंपळगाव ते महालगाव दरम्यान पावसाळ्यात वाहलेला नाल्यावरील पूल दुरुस्त, भाजपा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश









