काटोल :- काटोल यांच्या रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन काटोल येथे अप क्र. ३२९/२०२२ कलम ३०२ भादवि अन्वये गुन्हा नोंद झालेला होता. फिर्यादी नामे पंचफुला नारायण अडकने, वय ४८ वर्षे, रा-ईसापूर खुर्द ता
सदर गुन्हयाची हकीकत यप्रमाणे आहे की, सदर घटना दिनांक १३/०५/२०२२ रोजी मौजा ईसापुर खुर्द ता काटोल येथे मृतकाचे राहते घरी घडली आहे. फिर्यादीची मुलगी मृतक नामे चित्रा संदिप धोरमाडे, वय ३२ वर्ष, रा.ईसापूर खु. ता. काटोल आणि आरोपी संदिप पद्माकर घोरमाडे, वय ४२ वर्ष, रा. ईसापूर खु., ता. काटोल हे पती पत्नी असुन आरोपी हा नेहमी दारू पिण्याच्या सवयीचा असुन तो मृतक पत्नी सोबत कोणत्या ना कोणत्या कारणा वरून वादवीवाद करून तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. नमुद घटना ता. वेळी व ठिकाणी यातील आरोपी याने त्याचे मृतक पत्नीसोबत वादविवाद करून तीच्या चारित्र्यावर संशय घेवून कोणत्यातरी धारदार शस्त्राने वार करून जिवानीशी ठार केले, अशा फिर्यादीच्या रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोद होता.








