spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अंदाज पत्रकानुसारच डांबरीकरण करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

कन्हान :- नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत प्रभाग क्र. ९ मधील राष्ट्रीय महामार्ग ते कुरडकर मार्गावरील डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम मंजुर अंदाजपत्रक व शासकीय नियमांनुसारच करण्यात यावे, अशी ठाम मागणी माजी नगराध्यक्षा करुणा आष्टणकर च्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मुख्याधिकारी दिपक घोडके यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.

पायाभुत सुविधा योजने अंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सदर रस्ता बांधकामाचे अंदाज पत्रक मंजुर असुन निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कंत्राटदाराला कार्यादेशही देण्यात आला आहे. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजुना असलेल्या अतिक्रमणामुळे ते नियमानुसार हटविण्यास झालेल्या विलंबामुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास उशीर झाला. सध्या परिस्थिती अनुकूल असुन बहुतांश दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण हटविले आहे. त्यामुळे रस्ता बांधकामास कोणतीही अडचण राहिलेली नाही. त्यामुळे आता काम सुरू करताना सुरुवाती पासुन शेवटपर्यंत रस्त्या ची लांबी व रुंदी मंजुर अंदाज पत्रकानुसारच ठेवावी अशी मागणी करण्यात आली. भविष्यात नागरिकांच्या वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. जर बांधकाम करताना अंदाजपत्रक किंवा शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळुन आले, तर नागरिकांकडुन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शिष्टमंडळात माजी नगराध्यक्षा करूणा आष्टणकर, नगरसेविका रेखा टोहणे, प्रशांत मसार, भारत पगारे, शैलेश दिवे, सम्राट पगारे आदीसह परिसरातील नाग रिक बहु संख्येने उपस्थित होते.

Popular Articles