किशोर साहू,मौदा ,ता.११:- जि.प.उच्च प्राथमिक शाळा भेंडाळा येथील विद्यार्थी संकेत केदार यादव रामटेक येथे झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत 200 मिटर धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवीला त्याबद्दल त्याचे ग्रामपंचायत भेंडाळा सरपंचा शिल्पा राजकुमार भोयर, ग्रामपंचायत सदस्य गौरीशंकर कारेमोरे सह ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी, सदस्यगण शाळेतील मुख्याध्याक बालपांडे , शिक्षकवृंद अनिलकुमार थोटे ,देशपांडे ग्रामपंचायत व शाळेतील कर्मचारीवृंद सह समस्त ग्रामवासियांनी संकेतला जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेस शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे.








