spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शिक्षण विभागा कडून कारवाई साठी टाळाटाळ होत असल्याची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची तक्रार 

यवतमाळ १७ : येथील इलिगंट इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल, नेर या शाळेच्या अनधिकृत बांधकामामुळे व शिक्षण विभागाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे शाळा बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत नानवतकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 निवेदनात म्हटले आहे की, नेर येथील वसाहतीमध्ये ही शाळा परवानगीशिवाय चालवली जात असून, संस्थेने शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन आणि पालकांच्या विश्वासाला धोका दिला आहे. शाळेचे इमारत बांधकाम हे परवानाधारक जागे वर नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिक्षण विभागाच्या आरटीई कायद्यानुसार शाळा मंदिरापासून ३०० मीटर अंतरावर असणे आवश्यक आहे, मात्र सदर शाळा मंदिराच्या अगदी समोर आहे.
 याशिवाय ज्या नवीन जागी शाळा भरवण्यात आली आहे तिथे विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, खेळाचे मैदान, अग्निशमन व्यवस्था, स्वच्छतागृह, प्रवेशद्वार या सर्व बाबतीत नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे.
 शाळेतील प्रमुख त्रुटींचा अहवाल पंचायत समितीनेही सादर केला असून, यात शिक्षक अपूर्ण, प्रयोगशाळा व ग्रंथालयाचा अभाव, वर्ग खोली अपुरी, शैक्षणिक दर्जा निकृष्ट इत्यादी गोष्टी नमूद केल्या आहेत. तरी अशा बोगस व अनधिकृत शाळेवर जिल्हा प्रशासनाने त्वरित कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
 निवेदनाची प्रत — जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्रार्थमिक व माध्यमिक , पंचायत समिती नेर शिक्षण विभाग, व अन्य संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
 प्रमुख मागण्या:
 शाळेची मान्यता तात्काळ रद्द करावी.
 संस्थाचालक व व्यवस्थापनावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये सुरळीत व्हावेत यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी.
पालकांची फसवणूक थांबवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.