spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाकाली नगर चौकात मॉ जिजाऊंचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात

– आईचे संस्कार जीवन घडवतात….. मनोहर सपकाळ यांचे प्रतिपादन

नागपूर :- शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या राजमाता जिजाऊ मातेचा जन्मोत्सव सोहळा सोमवारी 12 जानेवारीला महाकाली नगर चौकात मोठ्या उत्साहात पार पडला. सोहळ्याचे आयोजन मॉ जिजाऊ डेअरी व महाकाली नगर मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्य आयोजक किशोर पवार यांचे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतुल लोंढे, मनोहर सपकाळ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमा प्रसंगी देवराव प्रधान, शाहू पवार, भूषण टिक्कस, आशिष काळे, प्रशांत पवार, विकास हिंगे, सही पवार, चंदाताई पवार, मिलिंद काळे, पराग धर्माधिकारी, सचिन शिंदे, रितिक मेश्राम, जितू वानखेडे, दीपक लाडसे, मनीष काटोले, नितेश वानखेडे, गोतमारे पाटील, तुषार काळेयांच्यासह महानगरपालिका निवडणूक लढविणारे सर्व पक्षांचे उमेदवारांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवर, वस्तीतील नागरिकगण, दुकानदार संघ उपस्थित होते. राजमाता मॉ जिजाऊ यांची 428 वी जयंती निमित्ताने प्रवक्ते अतुल लोंढे, मनोहर सपकाळ, मुकेश रेवतकर आणि श्रीमती सविता मोहन मते यांनी मॉ जिजाऊ यांच्यावरील प्रकाश टाकला. भाग संघचालक मनोहरराव सपकाळ यांनी जिजाबाईचे योगदानाचे वर्णन करतांना सांगितले की, शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य, स्वधर्म व स्वाभिमान यांची बिजे रोवली रामायण, महाभारत व संतांची शिकवण याद्वारे संस्कार, स्त्री शक्ती, संस्कार त्याग, राष्ट्र निष्ठा यांचे मूतिर्मंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ असे म्हटले. संचालन दीपक खेडकर यांनी तर आभार चंदा पवार यांनी मानले.

Popular Articles