spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मकरसंक्रांत निमित्त एबीव्हीपी तर्फे पतंग स्पर्धेचे आयोजन

किशोर साहू, मौदा, ता. १६ :- बुधवार ( दि. १४ जानेवारी) ला मकरसंक्रांतीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मौदा नगर येथे ABVP यांच्या माध्यमातून पतंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात रामटेक जिल्हा संयोजक आर्यन झाडे, जिल्हा आयाम गतिविधी प्रमुख युगेश देशमुख, मौदा नगर सहमंत्री प्रियांशु बावनकुळे, मौदा नगर सहमंत्री पियुष वैद्य, राहुल बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच या कार्यक्रमात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सर्व कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मकरसंक्रांतीचा उत्साह, आनंद व संघटनात्मक एकोपा या उपक्रमातून दिसून आला.

“काट न सखे कभी कोई पतंग आपकी, ना टूटे डोर विश्वास की, छु लें आप जिंदगी की सारी कामयाबी ,जैसे पतंग छूती होती है, ऊंचाइयां आसमान की…..!

Popular Articles