spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खापा न. प. उपनगराध्यक्षपदी सुनील पाहुणे विजयी, भाजपकडून पुष्पेंद्र (मुन्ना) शर्मा, काँग्रेसकडून छगन कवडे स्वीकृत सदस्यांची निवड

खापा, वार्ताहर :- नगरपरिषद उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपले राजकीय वर्चस्व कायम राखत भाजप समर्थित अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले सुनील सुधाकर पाहुणे यांना ११ विरुद्ध १० मतांनी दणदणीत विजय मिळवून दिला. काँग्रेसकडून कविता स्वप्निल धराळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांना केवळ दहा मतांवर समाधान मानावे लागले.

स्वीकृत सदस्यासाठी भाजपकडून पुष्पेंद्र (मुन्ना) शर्मा व काँग्रेसकडून छगन रामभाऊ कवडे यांची निर्विरोध निवड करण्यात आली. बुधवारी (ता. १४) मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली.

नगराध्यक्ष पियूष बुरडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.१४) नगर परिषद कार्यालयात पार पडलेल्या विशेष सभेत ही निवडणूक झाली. खापा नगरपरिषदेत एकूण २० नगरसेवकांपैकी ९ जणांचे संख्याबळ भाजपकडे आणि १० जनाचे संख्याबळ काँग्रेसकडे, तर १ अपक्ष असल्याने उपाध्यक्षपद कुणाकडे जाणार हे स्पष्ट नव्हते. मात्र अंतिम क्षणी कोणाची निवड होणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती.

अपक्ष निवडून आलेले सुनील पाहुणे हे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्ती आहेत. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. निवडून आल्यावर भाजपला समर्थन दिले.

यावेळी काँग्रेसचे गटनेता नामदेव गजभिये, प्रतोद आशिष ढाले, नगरसेवक गणेश आके, प्रमिला बोकडे, मनोरमा श्रीयाम, संजय सोनकुसळे, कविता धराळे, मिलिंद बुरडे, वैशाली लाड, लीला बागडे, आणि भाजपचे गटनेता रवी परतेती, उपगटनेता शोभा (मानकर) कारणकर, प्रतोद निखिल आष्टनकर, नगरसेवक वैशाली लिखार, किशोर आष्टनकर, अंजली मेनकुदळे, प्रशांत तुमाने, निशा कठौते, रोशनी डेरे यांच्यासह भाजप व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular Articles