spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पीएमश्री नगरपरिषद राजेंद्र हायस्कूलमध्ये चिल्लर बँक स्थापन

खापा, वार्ताहर :- स्थानिक पीएमश्री नगरपरिषद राजेंद्र हायस्कूलमध्ये नुकतीच चिल्लर बँक स्थापन करण्यात आली. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी आणि त्यांना पैशाचे नियोजन समजावे. या उपक्रमांतर्गत शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यात आले. विद्यार्थ्यांना बँकेच्या वतीने एक पासबुक (बचत कार्ड) देण्यात आलेले असून त्यामध्ये त्यांच्या दैनंदिन बचतीची नोंद केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना बँकेचे विविध पदे देण्यात आली व त्यांना प्रत्यक्ष बँक कशाप्रकारे असते हे समजून सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून बचत करून त्यांना या माध्यमातून प्रत्यक्ष बचतीचे व व्यवहाराचे तसेच गणिताचे ज्ञान मिळणार आहे. जमा झालेले पैसे हे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गरजा किंवा शालेय सहलीसाठी काढता येईल. बँकेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक सुनील नेहारे, डिस्ट्रिक्ट मॅनेजर मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचे प्रशांत लोखंडे, क्लस्टर मॅनेजर दिपाली बांगरे, पर्यवेक्षक शामराव खडसे तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य महेंद्र आष्टनकर, वसंता नीनावे, वर्षा बावनकुळे, शिल्पा वारोतकर, माधुरी बांगडे, शिक्षिका निता चामाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

कार्यक्रमाचे आयोजन जीवन कौशल्य शिक्षक श्वेता गभने, लिटरसी शिक्षक संदीप तितरमारे, समुदाय समन्वयक करिष्मा तायवाडे तसेच मॅजिक बस इंडिया फाउंडेशन आणि जे एस डब्ल्यू फाउंडेशन यांच्यातर्फे करण्यात आले. यावेळी विद्यालयातील शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अर्चना सुरजुसे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार शामराव खडसे यांनी मानले.

Popular Articles