spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नवनिर्वाचित नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या वतीने लोकप्रिय बाबू हरदास एल एन व कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांना सामूहिक आदरांजली

कामठी :- जयभीम प्रवर्तक बाबू हरदास एल एन व कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या पुण्यस्मूर्ती मेळाव्या निमित्त आज 15 जानेवारीला कन्हान नदीच्या तीरावरील हरदास स्मूर्ती स्मारक येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी लोकप्रिय बाबु हरदास एल एन व कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या समाधीस्थळी पुष्प चक्र अर्पण करून मानवंदना वाहली.

याप्रसंगी पूज्यनिय भन्ते नागदिपंकर, भाजप शहराध्यक्ष मंगेश यादव,नगरसेवक लालसिंग यादव,माजी नगरसेवक कपिल गायधने , उज्वल रायबोले,अकबर अली,आशु अवस्थी, धीरज मेश्राम, अविनाश डांगे,नागसेन सुखदेवें, राजन मेश्राम ,रोनीत गजभिये,मुकेश वैद्य आदी उपस्थित होते.

Popular Articles