– राज्य क्रीडा दिनानिमित्त कुस्ती स्पर्धा उत्साहात
हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- प्रतिकुल परिस्थितीवर मात करून कुस्तीपट्टू स्व. खाशाबा जाधव यांनी देशाच्या पातळीवर भारताचे नाव लौकिक केले आहे. त्यांची आठवण राहावी म्हणून राज्य सरकारने त्यांच्या जन्म दिनानिमित्त राज्य क्रीडा दिन जाहीर केले आहे. म्हणून जिल्ह्यातील खेळाडूंनी ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावे असे प्रतिपादन क्रीडा अधिकारी निखिलेश तभाणे यांनी केले.
ते क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, भंडारा व एकविध क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ऑलिंपिकवीर स्व. खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिनाच्या निमित्ताने बॅडमिंटन हॉल मध्ये जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत मार्गदर्शन करतांना बोलत होते.
सदर जिल्हास्तरिय कुस्ती स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन दि भंडारा अर्बन को – ऑपरेटिव्ह बँकेचे प्रशासकिय अधिकारी विशाल भोंगाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकविध क्रीडा संघटनेचे सचिव सुनिल कुरंजेकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्रीडा अधिकारी निखिलेश तभाणे, कुस्ती पंच अशोक बन्सोड, दि भंडारा अर्बन को – ऑपरेटिव्ह बॅंकेचे लिपिक सारंग पांडे, सोहेब अंसारी, क्रीडा पत्रकार विलास केजरकर क्रीडा शिक्षक रामटेके, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ऑलिंपिकवीर पहेलवान स्व. खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन व मार्ल्यापण करून उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यातील कुस्ती खेळाडूंनी अविरत सराव करून जिल्ह्याचे नाव लौकिक करावे. असे मत एकविध क्रीडा संघटनेचे सचिव सुनिल कुरंजेकर यांनी केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी ऑलिपीकवीर स्व. खाशाबा जाधव यांची जिवनगाथा व त्यांचे कुस्ती क्रीडा क्षेत्रातील योगदान याबाबत खेळाडूंना विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. व राज्य क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातील ६० च्या वर महिला व पुरुष कुस्ती खेळाडू सहभागी झाले होते. अशोक बन्सोड, विलास केजरकर, नशिब उके, शुभम बागडे, आशिष देशकर यांनी पंचांची योग्य कामगिरी बजावली होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विलास केजरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अशोक बन्सोड यांनी मानले.
या राज्य क्रीडा दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता खुशी शहारे, सोयम बोंद्रे, अनन्या मडामे, पुर्वी मांढरे, प्रांजली बोंद्रे, पुजा समरित, हिमांशू समरित, यश मेश्राम, अतुल गजभिये, वेदांत तरारे, वंश चेटुले, आयुष चवळे, अर्नव चवळे, शिवम धुळसे, अंश चवळे, प्रथमेश धुळसे,अमन चवळे, क्रिष्णा धुळसे, भाग्यश्री मते, नैतिक धुळसे, सोनाक्षी बांडेबुचे, सोनल पंचबुध्दे, समृध्दी मेश्राम, अंश पंचबुध्दे, मच्छिंद्र मडामे, मुन्ना मांढरे, चंद्रशेखर बोंद्रे, विष्णू पंचबुध्दे, अर्जून बोंद्रे तुळशीदास चवळे व क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक, पालक वर्ग इत्यादींनी सहकार्य केले.
कुस्ती स्पर्धेचा निकाल
*U-14 मुले*
सारंग लुटे, वंश चेटूले, वेदांत तरारे, *U-17*
अमन चवळे, यश मेश्राम, पवन लुटे,
*U-19
संस्कार केजरकर तसेच
*मुली U-14
सोनल पंचबुध्दे, पुर्वी मांढरे, अनन्या मडामे,
*U-17
पुजा समरित, सोनाक्षी बांडेबुचे, खुशी शहारे,
*U-19
भाग्यश्री मते यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला आहे. विजयी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले आहे.




