spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नवनिर्वाचित नगरसेवक आकाश भोकरे यांचा बरीएम मध्ये प्रवेश

कामठी :-.नुकत्याच संपन्न झालेल्या कामठी नगर परिषद च्या प्रभाग क्र 17 च्या अटीतटीच्या लढतीत बरीएम समर्थीत अपक्ष उमेदवार आकाश भोकरे यांनी भाजप उमेदवाराचा पराभव करून मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केला.या विजयाचे श्रेय प्रभागतिल मतदारासह बरीएम संयोजिका माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे,बरीएम पदाधिकारी अजय कदम आदी पदाधिकारीना देऊन ऍड सुलेखा कुंभारे यांना प्रभावित होऊन नगरसेवक पदी वर्णी लागताच नगरसेवक आकाश प्रदीप भोकरे यांनी माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या मुख्य उपस्थितीत बहुजन रिपब्लिकन एकता मंच मध्ये प्रवेश घेतला.

याप्रसंगी कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अजय कदम,रेखा भावे,रजनी लिंगायत,माजी नगरसेविका सावला सिंगाडे,नगरसेवक नियाज अहमद कुरेशी, उदास बन्सोड, सुभाष सोमकुवर,विलास बन्सोड,अंकुश बांबोर्डे,अनुभव पाटील आदी उपस्थित होते.

Popular Articles