spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैध रेती वाहतूक उघड; २ गुन्हे नोंद, २ अटक

– ९० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

मौदा :- मौदा पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी टोल नाका माथनी येथे नाकाबंदी केली असता वाहन के १) ट्रक क्र. एम एच ४०बि. एफ ९९१० आणि वाहन के २) ट्रक क्र. एम एच ४०सी टी ९३०० मिळून आल्याने वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती आढळुन आली. दोन्ही चालकांना विचारपुस केली असता वाहन के १) चा चालक अमित नरेश बागडे, वय ३२ वर्ष, रा. फुलमोगरा ता. जि. भंडारा तसेच वाहन कं २) चा चालक सुमीत लक्ष्मण मेश्राम, वय २६ वर्ष, रा. नाथ नगर मौदा ता. मौदा अशी माहीती पोलीसांना प्राप्त झाली. पोलीसांनी आरोपीतांना रेती वाहतूकीच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याबाबत माहिती प्राप्त झाली. पोलीसांनी पंचासमक्ष वर नमुद दोन्ही वाहने किमती ९०,००,०००/- रूपये आणि वाहन कं १ आणि २ मधुन एकुण १९ ब्रास रेती किंमती ९५,०००/- रूपये असा एकुण ९०,९५,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नमुद आरोपी यांच्या विरूध्द पोस्टे मौदा येथे कलम ३०३ (२), ४९ भा.न्या.सं सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, सहकलम ४, २१ खाण खनिज अधिनियम, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ अन्वये २ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.

Popular Articles