spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हिंगणा मार्गावरून वर्धाकडे जाणारा मार्ग होणार अधिक सुलभ

– टाकळी सीम सिमेंट रस्त्याची आयुक्तांकडून पाहणी

नागपूर :- हिंगणा मार्गावरून वर्धाकडे जोडणाऱ्या मार्गाचे काम अंतिम टप्यात आहे, हा मार्ग पूर्ण झाल्यावर हिंगणा मार्गावरून वर्धा कडे जाणाऱ्या नागरिकांना ये-जा करणे सुलभ होईल, वर्धा रोडकडे जाण्याकरिता अधिक लांब जाण्याची गरज भासणार नाही, या मार्गाची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी (ता. २०) पाहणी केली.

याप्रंसंगी मुख्य अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, कार्यकारी अभियंता अनिल गेडाम, उपअभियंता राजीव गौतम उपस्थित होते. आयुक्तांनी पाहणीच्या दरम्यान अधिकाऱ्यांना काही आवश्यक सूचना केली.

हिंगणा मार्गावरून चंद्रपूर, बुटीबोरी व वर्धा मार्गाकडे जाण्यासाठी असलेल्या रिंगरोडवर अधिक वर्दळ राहत असल्याने टाकळी सीम येथील सिमेंट रस्ता अधिक सोयीचा ठरणार आहे. या भागातील नागरिकांच्या मागणी वरून हा मार्ग मनपातर्फे तयार करण्यात आला असून, सदर मार्ग हा ऑरेंज सिटी स्ट्रीटला जोडून तयार करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या मूलभूत सुविधेअंतर्गत प्राप्त ६३ कोटी रुपयांच्या निधीतून ५.५ किलोमीटर लांबीचा वर्धा रोडपासून हिंगणा मार्गापर्यंतचा मार्ग तयार करण्यात आला आहे. याठिकाणी असलेली झोपडपट्टी हटविण्यात आली तसेच १२,६१९ वर्ग फुटाचा खासगी भूखंडाचे ९ कोटी रुपयात अधिग्रहण करून हा रस्ता तयार करण्यात आला आहे. या वर्गावर रस्त्यावर आकर्षक खांब वर सुंदर स्ट्रीट लाईट लावण्यात आले आहे. तसेच पावसाळी पाणी वाहण्यासाठी पावसाळी नाळीवर स्टील ग्रील लावण्यात आली आहे.

Popular Articles