spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

श्री गणेश मंदिर टेकडी गणेश जयंतीनिमित्य भव्य शोभायात्रा 22 जानेवारीला

नागपूर :- श्री गणेश मंदिर टेकडी च्यावतीने गुरूवार दि. 22 जानेवारी 2026 रोजी, सायंकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत श्री गणेश जयंतीनिमित्त याहीवर्षी 22 जानेवारी ला गणेश यागाचे आयोजन मंदिराचे वेदमूर्ती आचार्य यज्ञेश दिक्षित, पं. संकेत देशमुख, पं. विश्वनाथ शर्मा, ब्रम्हवृद अंहुश व्यास, शंभू टानपे, अजिंक्य कुळकर्णी, निलेश शर्मा, रघुनाथ शर्मा, यांच्या पौरोहित्या खाली करण्यात येणार आहे. गणेश यागाचे प्रमुख यजमान अभिषेक अग्रवाल सपत्नीक असून दि. 21 जानेवारी रोजी सकाळी 9 वा. गणेश यागात श्री गणेश पूजन व नवग्रह पूजन, वास्तू पूजन होऊन गणेश यागाच्या हवनास सुरूवात होईल व दि. 22 जानेवारीला दुपारी 12 वाजता. श्री गणेश यागाची पुर्णाहुती होईल. याप्रसंगी “श्री” ना फुलांची आकर्षक शेज करण्यात येणार आहे. तसेच मंदिरातर्फे तीळाच्या रेवडीचे प्रसाद वितरण करण्यात येईल. दरवर्षी प्रमाणे मंदिरातर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असून यांत भक्तांचा उत्स्फुर्त सहभाग व सहकार्य लाभते. यानिमित्य शोभायात्रा समितीचे गठण करण्यात आले आहे. ही शोभायात्रा सांयकाळी 5 वाजता गणेश मंदिरातून निघेल. मानस चौकातून अन्सारी रोड, राजस्थानी महीला मंडळ पासून मॉरेस कॉलेज टि पाईंट ते व्हेरायटी चौक, सिताबर्डी मेन रोड, लोखंडी पूल ते मानस चौक मार्गे श्री गणेश मंदिर येथे रात्री 8 वाजता विसर्जित होईल. श्री गणेश जयंतीनिमित्य शोभायात्रेत भव्य श्री चा रथ व आकर्षक झाँकी, घोडा, बॅन्ड, ढोलताशा पथक, विद्युत रोषनाई, तसेच मंगल कलश पथकाचे आयोजन केले आहे. बर्डी मेन रोडवरील व्यापारी वर्गाचे सहकार्य असते. श्री गणेश मंदिरा तर्फे रविवार दि. 25 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 ते 4 पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांनी अवश्य प्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन कार्यकारीणी मंडळातर्फे करण्यात येत आहे.

– कार्यकारीणी मंडळ –

अध्यक्ष श्रीराम बी. कुळकर्णी उपाध्यक्ष, अरूण जी. व्यास, सचिव दिलीप शहाकार, सहसचिव सुनिल एस. अगिन्होत्री, कोषाध्यक्ष हरी लक्ष्मण भालेराव,

विश्वस्त – अरूण कुळकर्णी, विकास लिमये, शांतीकुमार शर्मा, शरद नरहर वैद्य, कमलसिंग चोप्रा, वासुदेव गंगवाणी,

Popular Articles