spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागरिक समीती प्रभाग क्रमांक १७ तर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

नागपूर :- महानगरपालिका 2026 च्या नुकत्याच पार पडलेल्या प्रभाग क्रं. १७ प्रभागातील सर्वच विजयी नगरसेवकांचा अभिनंदन समारंभाचे आयोजन गुरुवारी २२ जानेवारीला करण्यात आले होते. प्रभागात ३ नगरसेवक कांग्रेस पक्षाचे तर १ नगरसेवक भा.ज.पा.चा निवडून आलेत. समारंभाचे अध्यक्ष माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रमुख अतिथी अधिवक्ता अशोक यावले आणि माजी नगरसेवक डॉ. सूर्यकांत भगत होते. समारंभास नवनिर्वाचित नगरसेवक सुजाता कोंबाडे, कांचन चव्हाण, सुहास नानवटकर आणि मनोज साबळे हे सत्कार मूर्ती म्हणून उपस्थित होते. चारही नगरसेवकांनी सर्व मिळूनच या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यात आम्ही योग्य समन्वय ठेऊन विकास करण्यास कटिबद्ध आहोत. अशी ग्वाही दिली. अध्यक्ष व अतिथींनी हा प्रभाग शहरात अति महत्वपूर्ण प्रभाग आहे यात मेडिकल कॉलेज, मध्यवर्ती बस स्थानक, रेल्वे स्टेशन, गांधी सागर, फुले मार्केट, गुरुदेव सेवा मंडळ, गीता मंदिर इत्यादी महत्वपूर्ण स्थान आहेत, तेव्हा तितक्याच प्रभावीपणे यांचा विकास घडवून आणणे, तसेच नाविन्यपूर्ण प्रकल्प उभारुन यांचे महत्व अजून वाढवावे, प्रभागातील वेळो वेळी निर्माण होण्याऱ्या समस्यांचे निराकरण करून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, तिनही अतिथींनी महानगरपालिकेच्या त्यांना आलेल्या अनुभवातुन उचित मार्गदर्शन केले. आणि सर्वांच्या हातुन नागरिकांची सेवा घडावी अशी कामना व्यक्त केली. समारंभाचे प्रास्ताविक रामदास टेकाडे यांनी केले तर संचालन दिलीप सुरकार व आभार राजेश कुंभलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला ज्ञानेश्वर रक्षक, प्रभा ठवकर, राजु पवार, डाँ.कोबांडे, विजय कदम, निरज चौबे, संजय शिंदे, नरेश खडसे प्रभाग १७ चे बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Popular Articles