spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राज्यस्तरीय सर्व जातीय, सर्व धर्मीय पुनःरविवाह परिचय मेळावा आयोजन बैठक संपन्न

– 22 फेब्रुवारी ला राज्यस्तरीय सर्व जातीय,सर्व धर्मीय, विधवा, विधूर, घटस्फोटीत, अपंग, प्रौढ पुनःर्विवाह “पुनःरबंध” परिचय मेळावा

नागपूर :- महात्मा फुले शिक्षण संस्था रेशीमबाग नागपूर येथे रविवार दि. 22 फेब्रुवारी 2026 ला सकाळी 11 वाजता राज्यस्तरीय सर्व जातीय,सर्व धर्मीय, विधवा, विधूर, घटस्फोटीत, अपंग, प्रौढ पुनःर्विवाह “पुनःरबंध” परिचय मेळावा आयोजित केलेला आहे त्याप्रित्यर्थ, रविवारी दि. 25 जानेवारी रोजी, सायंकाळी 5 वाजता. संस्थेच्या महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात राज्यस्तरीय सर्व जातीय व सर्व धर्मीय समाज बांधवांची बैठक संपन्न झाली. नोंदणी करायची शेवटी तारीखं 12 फेब्रुवारी आहे. नोंदणी शुल्क 500/- रुपये असून “पुनःरबंध” परिचय पुस्तिका निशुल्क मिळणार आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे कार्याध्यक्ष व संयोजक प्रकाश देवते मो. न. 94228-09688 यांच्याशी संपर्क साधावा. याप्रसंगी समाज बांधवानी आपले मतं व्यक्त केले. यावेळी प्रा.अरुण पवार, शेखर सावरबांधे, शुभाष घाटे, नगरसेवक शकील पटेल, प्रकाश देवते, गुलाब चिंचाटे, रवींद्र अंबाडकर, रमेश राऊत, प्रा.मुकेश घोळसे, गजेंद्र जाधव, नरेंद्र मोहिते, शालिकराम कुकडे, बाळासाहेब गायकवाड, शंकर चुरागळे, अजय तितरमारे, रोशन लांजेवार, विक्रांत अवधरे, सुरेश पाठक, चंदू धांडे, लता होलगरे, बंडू पारवे, गजानन देऊळकर, अरुण टिकले, संजय चौधरी, पुरुषोत्तम कुथे, सुरेंद्र टिंगणे, ओंकारेश्वर गुरव, आशिष खडके, स्वप्नील तोरणकर, राजेंद्र पाटील, मोहीत श्रीखंडे प्रा.पंकज कुरळकर, शोभा लेकुरवाळे उपस्थित होते.

Popular Articles