नागपूर :- आदिवासी हलबा समाज विकास संस्थेच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेह मिलन कार्यक्रम रविवारी २५ जानेवारी रोजी श्री कोलबास्वमी सांस्कृतिक सभागृह, जैसाव वाडी, टेलिफोन एक्सचेंज चौक, सी.ए.रोड नागपूर येथे मनोहरराव वाकोडिकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन विश्वनाथ आसई, संजय नंदनवार, गिरीश नंदनवार, किर्ती कुमार पराते, प्रदीप हेडाऊ, चंद्रकला बारापात्रे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक सचिव भास्कर चिच़घरे यांनी केले. प्रास्ताविके मध्ये संस्थेच्या कार्याची माहिती सविस्तरपणे सचिवांनी दिली. उदघाटनप्रसंगी पाहुण्यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, संस्थेद्वारे राबविण्यात येणार अनेक उपक्रम जसे शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर, आरोग्य शिबिर, करियर मार्गदर्शन शिबिर, जागतिक महिला दिन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करून समाजाच्या गरिब विद्यार्थ्यांना व महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य करित आहे. संस्थेतर्फे अशा प्रकारचे कार्यक्रम नि:स्वार्थपणे राबवीत असतात याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. असे पाहुण्यांनी मार्गदर्शन करतांना आपले मत व्यक्त केले. वार्षिक स्नेह मिलन कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात आले होते. वार्षिक स्नेह मिलन कार्यक्रमाचे संचालन प्रशांत माताघरे यांनी तर आभार संगीता सोनक हिने मानले. कार्यक्रमात समाजातील मान्यवर तसेच समाजातील महिला, पुरुष व युवक युवतींनी मोठ्या संख्येने भाग घेतला व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला. वार्षिक स्नेहमिलन कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतलेत. असे सचिव भास्कर चिच़घरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.








