spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र, कोराडी येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

खापा :- प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र कोराडी येथे सकाळी ७ वाजता महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र कोराडीचा प्रागणात ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते जेष्ठ पत्रकार दिलीप येवले यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी थर्मल पॉवर स्टेशन कोराडीचे आस्थापना अधिकारी सुभाष चिमुरकर उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर ध्वज सलामी, राष्ट्रगीत व संविधान प्रस्ताविकाचे वाचन करण्यात आले. अध्यक्षांनी आपल्या भाषणामध्ये उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिवसाचा शुभेच्छा दिल्या. शिशु मंदिरातील बालकांना मान्यवरांच्या हस्ते गोड खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केंद्र संचालक सचिन वंजारी यांनी केले. आभार प्रदर्शन केंद्र महिला कल्याण सहायिका शालू टेकाडे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उर्मिला सातपुते, युवराज मते यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाकरिता केंद्र सभासद व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Popular Articles