spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जैन कलार प्रीमियर लीग २०२६ – सीझन ८ चे भव्य आयोजन

नागपूर :- जैन कलार युथ फाऊंडेशनच्या वतीने जैन कलार प्रीमियर लीग २०२६ – सीझन ८ या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक २९, ३०, ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ८ वाजता. आयोजित करण्यात येणार असून स्पर्धेचे स्थळ ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, क्रीडा चौक, हनुमान नगर, नागपूर असे आहे. या स्पर्धेमध्ये समाजातील विविध संघ सहभागी होणार असून, युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे, संघभावना वृद्धिंगत करणे व समाजात क्रीडा संस्कृती रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेचे उद्घाटन दिनांक २९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता. मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. सदर स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी पंकज खानोरकर, पंकज दहीकर, महेश तिडके, अक्षय खानोरकर, मयुरेश दडवे, पारस मोरघरे, अक्षय तिडके, सचिन दहीकर, राहुल शेंडे, निखील हरडे, राकेश मासुरकर, राकेश शिरपुरकर, नितीन दहिकर, स्वप्निल राहाटे, सागर राहाटे, प्रदिप होरे, मोहन मासुरकर, कुणाल घोसेकर, अमोल तिडके व वीरेश दुरुगकर हे व ज्येष्ठ नागरिक संयोजक परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेला नागपूर शहरातील क्रीडाप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला असून, सर्व क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जैन कलार युथ फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

— जैन कलार युथ फाऊंडेशन, नागपूर

Popular Articles