spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

उपाख्यमंत्री अजित पवार निधन प्रतिक्रिया

1) दिलेल्या शब्दाला पाळणारा नेता महाराष्ट्राने गमावला ! 

विधानसभेमध्ये काम करत असतांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मला मतदार संघातील सर्वांगीण विकास करण्यासाठी 5 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून विकासाचे व्हिजन कसे असावे याचे प्रात्यक्षिक मला कृतीतून दाखऊन दिले असून राजकारणामध्ये दूरदृष्टी, धाडस आणि प्रशासनाला योग्य दिशा देणारा एक आधारवड नेता महाराष्ट्राने गमावला आहे. दादा, तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी काळ जरी पुढे गेला तरी भरून निघणारी नाही. लोकहितासाठी घेतलेले कठोर निर्णय आणि निर्भीड भूमिका हीच तुमची खरी ओळख राहील.

– देवेंद्र भुयार माजी आमदार मोर्शी विधानसभा

2) जनतेच्या प्रश्नाची जाण असणारा लोकनेता हरपला –

अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक झंझावात शांत झाला आहे. शब्दांत व्यक्त न होणारे हे दुःख आहे. दादांनी नेहमीच कार्यकर्त्याला कुटुंबाप्रमाणे जपले, आज आम्ही आमचा आधार गमावला आहे.दादा, तुमचे विचार आणि तुमची कार्यपद्धती आम्हाला कायम प्रेरणा देत राहील

– अंकुश घारड जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष अमरावती जिल्हा.  

३) आज कार्यकर्त्याचा खरा नेता महाराष्ट्राने गमावला ! 

महाराष्ट्रात काम करत असताना इतर पक्षाचे नेते आणि कार्यकर्ता भेटत होते अजित दादा म्हणजे जननेता शब्द पाळणारा नेता कार्यकर्त्याची कदर करणारा नेता कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ता असो दादा त्याच म्हणणं ऐकत होते आणि त्याच समाधान देखील करत, आम्ही हे करताना प्रत्यक्षात बघितलेल आहे ही महाराष्ट्राची झालेली खूप मोठी हानी आहे भावपूर्ण श्रद्धांजली .

– रुपेश वाळके अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका 

४) अजितदादा यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक खंबीर ‘लोकनेता’ आणि जनतेने आपला हक्काचा ‘दादा’ गमावला आहे. त्यांनी दिलेला शब्द म्हणजे “काळ्या दगडावरची रेघ” असायची. अजितदादा म्हणजे प्रशासकीय शिस्त आणि विकासाच्या दृष्टी असलेला एक वेगळाच झंझावात होते. मंत्रालयापासून ते गावाकडच्या बांधापर्यंत ज्यांच्या नावाचा दरारा होता, तो दरारा आज कायमचा शांत झाला

– वृषाली प्रकाश विघे माजी महिला बाल कल्याण सभापती जीप अमरावती.

Popular Articles